नवी दिल्ली, 15 जानेवारी: बंगळुरूच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये (National Military School, Bangalore) अनेक पदांसाठी भरती (vacancies) निघाली आहे. इथे 16 एलडीसी, एमटीएस आणि लॅब असिस्टंट यासह इतर पदांसाठी भरती होणार आहे.
यासाठीच्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत. ज्या कुणाला अर्ज (application) करायचा आहे त्यांनी दिलेल्या अंतिम तारखेच्या आधी अर्ज पाठवून द्यावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2021 अशी आहे.
या पदांवर होईल भरती
एलडीसी - 3 पदं
लॅब अटेंडंट - 1 पद
एमटीएस चपराशी - 02 पदं
एमटीएस माळी - 01 पद
एमटीएस चौकीदार - 03 पदं
एमटीएस सफाईवाला - 04 पदं
वॉशरमॅन - 01 पद
टेबल वेटर - 01 पद
योग्यता आणि वयोमर्यादा -
एलडीसी - अर्जकर्त्याला संगणकावर इंग्रजी टायपिंग @35 शब्द प्रती मिनिटप्रमाणे आली पाहिजे. ही व्यक्ती बारावी पास असली पाहिजे. वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
लॅब अटेंडंट - दहावी पास किंवा समकक्ष. वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष
एमटीएस/चपराशी - दहावी पास किंवा समकक्ष. वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
एमटीएस/माळी - दहावी पास किंवा समकक्ष. वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
एमटीएस/वॉचमन - दहावी पास किंवा समकक्ष. वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
एमटीएस/सफाईवाला - दहावी पास किंवा समकक्ष. वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
वॉशरमन - दहावी पास किंवा समकक्ष. वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
टेबल वेटर - दहावी पास किंवा समकक्ष. वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
अर्ज कसा कराल
जे अर्जदार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलनं काढलेले अर्ज भरून आपला अर्ज सर्व गरजेच्या कागदपत्रांसह दिलेल्या पत्यावर पोस्टामार्फत (post) पाठवावा. आधी संस्थेनं दिलेली जाहिरात (advertisement) नीट वाचावी.
प्रधानाचार्य, राष्ट्रीय सैन्य स्कूल, बंगळुरू, कर्नाटक - 560025
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.