मुंबई, 10 जुलै: जॉब शोधण्यासाठी
(Job search) आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या
(Technology) काळात कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नाही. टेक्नॉलॉजीमुळे ऑनलाईन
(Online jobs) आणि सोशल मीडियावरच जॉब
(Job search on Social Media) शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स
(Job searching websites) उपलब्ध असतात. यापैकी काही वेबसाईट्स आपल्याकडून पैसे घेतात तर काही वेबसाईट्स फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाईट्सवर शोधूनही अनेक जणांना मनासारखा जॉब मिळू शकत नाही. या वेबसाईट्सवर जॉब शोधणं अनेकांना कठीण वाटतं. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही सोशल मीडियावरच जॉब
(Job search using Social Media) शोधू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
LinkedIn
LinkedIn हा जॉब शोधण्यासाठीचा सर्वात मोठा आणि प्रभावशाली प्लॅटफॉर्म आहे. यात प्रोफेशनल कंपन्यांचे मोठे अधिकारी, HR आणि कर्मचारी
(Employees) असे सर्वजण असतात. ज्यात तुम्हाला कंपनीच्या प्रोफाईलवर जाऊन लेटेस्ट जॉब्सबद्दल
(Latest jobs) माहिती मिळू शकते. तसंच LinkedIn वरून तुम्ही वरिष्ठांशी आणि अनुभवी लोकांशी जोडले जाऊ शकता.
Facebook
Facebook वर जॉब कसा शोधणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण मनोरंजनाच्या ठिकाणी जॉब मिळू शकतो असं अनेकांना वाटत नाही. मात्र फेसबुकच्या अप्लिकेशनमध्ये
'Jobs' नावाचा एक ब्लॉक असतो. ज्यात आपल्याला आपल्या क्षेत्रानुसार आणि शिक्षणानुसार जॉब शोधता येऊ शकतो. तसंच फेसबुकवर जॉब
(Facebook jobs) शोधण्यासाठी मदत करणारे ते काही ग्रुप्स असतात ज्यांना फॉलो करून आपण नोकरीबद्दल जाणून घेऊ शकतो.
हे वाचा -
Interview वेळी पगाराबद्दल बोलताना चुकूनही करू नका ही कामं; अन्यथा जाईल नोकरी
YouTube
तुम्ही YouTube वर आपला स्वतःचा व्हिडिओ तयार करू शकता. ज्यात तुमचा संपूर्ण बायोडेटा असेल आणि तुमच्यातील काही छुप्या कलाही त्यात असतील . अशा प्रकारचा व्हिडीओ Resume
(Video CV) अनेक कंपन्यांना आवडतो ज्यामुळे तुम्ही सिलेक्ट होऊ शकता.
Twitter
अनेक मोठे अधिकारी किंवा कंपनीचे CEO ट्विटरवर असतात. या सर्व लोकांना फॉलो करून तुम्ही त्यांना जॉबसाठी अप्रोच करू शकता. किंवा तुमच्या बायोडेटामधील काही गोष्टी ट्विट करून तुम्ही जॉबच्या संधींबाबत विचारणा करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.