Home /News /career /

ऐका हो ऐका! पुणे महानगरपालिकेचा ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम; 15, 000 रुपये Stipend

ऐका हो ऐका! पुणे महानगरपालिकेचा ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम; 15, 000 रुपये Stipend

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंटर्नशिप प्रोग्राम

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 05 जून: पुणे महानगरपालिका, PMC (Pune Mahanagar corporation) ने विविध क्षेत्रातील इंटर्न पदासाठी (PMC openings for Internship posts) अर्ज मागवले आहेत. यासाठीची अधिसूचना (PMC Intern recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विधी, अभियांत्रिकी, पर्यावरण, संगणक विज्ञान, सामग्री, फलोत्पादन, जीवशास्त्र, बी.कॉम आणि शॉर्ट हँड टायपिंग इंटर्न्स या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 असणार आहे. पीएमसीने ही भरती महाराष्ट्राच्या शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालयाने आयोजित केलेल्या अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (Urban Learning Internship Program) अंतर्गत घेतली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, द्विपक्षीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत, पदवीधरांना शिकण्याचा अनुभव मिळेल, तसेच नवीन ऊर्जा आणि कल्पना स्मार्ट सिटी आणि शहरी विकासासाठी मदत करतील. या पदांच्या इंटर्न्ससाठी भरती विधी, अभियांत्रिकी, पर्यावरण, संगणक विज्ञान, सामग्री, फलोत्पादन, जीवशास्त्र, बी.कॉम आणि शॉर्ट हँड टायपिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये इंटर्न नियुक्त केले जातील. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयाबाबत आणि पदाबाबत किमान माहिती असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. किती मिळणार पगार या इंटर्नशिपसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 10 हजार ते 15, 000 प्रति महिना स्टायपेंड दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -  15 जून 2022  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी internship.aicteindia.org/index.phpon या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Pune

    पुढील बातम्या