मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कधी विचार केलाय? IPS अधिकाऱ्यांना लाखो रुपये असतो पगार; नक्की कोणत्या मिळतात सुविधा? जाणून घ्या

कधी विचार केलाय? IPS अधिकाऱ्यांना लाखो रुपये असतो पगार; नक्की कोणत्या मिळतात सुविधा? जाणून घ्या

 IPS अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा

IPS अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा

आज आम्ही तुम्हाला IPS अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि त्यांना मिळणाऱ्या पगाराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 30 जानेवारी: UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत (Civil Services preparation tips) रुजू होण्याचे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न आहे. UPSC परीक्षेद्वारे (How to Pass UPSC exam) आयपीएस अधिकाऱ्याचीही (How to be IPS Officer) निवड केली जाते. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी भारतीय पोलीस सेवेतील (How to be officer in Police service) अधिकाऱ्यांवर असते. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नाही. पण एकदा का तुम्ही या सेवेत आलात की चांगला पगार आणि इतर सुविधा (Salary of IPS and IAS Officer) मिळण्याची पूर्ण हमी असते.

बहुतेक लोक आयएएस अधिकारी आणि आयपीएस अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांकडे (Facilities of IPS officer) आकर्षित होतात, परंतु त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल फारशी माहिती नसते. जर तुम्हाला सरकारी नोकरीच्या (Government jobs) माध्यमातून लोकसेवा करायची असेल, तर तुम्हाला आयपीएस अधिकारी वेतन (Salary of IPS Officer)आणि इतर सुविधा तसेच त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला IPS अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि त्यांना मिळणाऱ्या पगाराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Weekend नंतर तुम्हालाही Monday Blues येतात? चिंता नको; या टिप्समुळे राहाल Fresh

या मिळतात सोयी-सुविधा

IPS अधिकार्‍यांना सुरक्षा रक्षक, घरातील मदतनीस आणि ड्रायव्हर असा विशेष कर्मचारी दिला जातो. त्यांना वैद्यकीय सुविधाही दिल्या जातात, ज्यामध्ये ते कुठेही उपचार घेऊ शकतात. फोन आणि वीज बिलाचा खर्चही सरकार देते. आयपीएस अधिकाऱ्याला पेन्शनही दिली जाते. कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याला डीजीपी किंवा पोलिस आयुक्तपदावर जाऊन सर्वाधिक ताकद मिळते.

इतका मिळतो पगार

कोणत्याही IPS अधिकाऱ्याचा मूळ पगार 56 हजार 100 रुपयांच्या जवळपास असतो आणि तो रँकनुसार (IPS अधिकारी वेतन) वाढतो. IPS अधिकाऱ्यांना इतरही अनेक सुविधा मिळतात. प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याला त्यांच्या दर्जानुसार राहण्यासाठी घर मिळते. यासोबतच सरकारी वाहनही दिले जाते.

Job Tips: खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाहीये? अशा स्मार्ट पद्धतींनी शोधा Jobs; ऑफर्सची लागेल रांग

रँकनुसार पगार

पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) - 56 हजार 100 रुपये प्रतिमहिना

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) – 67 हजार 700 रुपये प्रतिमहिना

पोलीस अधीक्षक (SP) – मासिक वेतन 78 हजार 800 रुपये. प्रतिमहिना

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) – 1 लाख 18 हजार 500 रुपये प्रतिमहिना

पोलीस उपमहानिरीक्षक (DIGP) – 1 लाख 31 हजार 100 रुपये प्रतिमहिना

पोलीस महानिरीक्षक (IGP)- या पदासाठी 1 लाख 44 हजार 200 रुपये प्रतिमहिना

अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) – वेतन 2 लाख 5 हजार 400 रुपये प्रतिमहिना

पोलिस महासंचालक (डीजीपी) - मासिक वेतन 2 लाख 25 हजार रुपये प्रतिमहिना

First published:

Tags: Career, IPS Officer, Salary, Upsc exam, जॉब