नवी दिल्ली, 15 जुलै: CBSC बोर्डाचा दहावीचा निकाल आज आहे. निकाल आज काहीही लागला तरी त्यावर केवळ अवलंबून न राहता चांगले प्रयत्न आणि मेहनत करणं आपल्या हातात असतं. प्रामाणिक मेहनतीचं फळ नक्की मिळत याचं उत्तम उदाहरण देणाऱ्या IAS ऑफिसरची संघर्षगाथा खूप प्रेरणादायी आहे.
एकेकाळी IAS अधिकारी नितिन सांगवान यांना केमेस्ट्री विषयात CBSC बोर्डात केवळ 24 मार्क मिळाले होते. IAS अधिकारी नितीन सांगवान यांनी 2002 मधील त्यांच्या 12 वीचा निकाल ट्वीट केला आहे. 'माझ्या बारावीच्या परीक्षेत मला रसायनशास्त्रात (केमिस्ट्री) केवळ 24 गुण मिळाले आहेत. पास होण्यासाठी लागणाऱ्या अंकापेक्षा केवळ एक अंक जास्त असल्याचं सांगितलं. माझ्या आयुष्यात मला काय हवं हे गुणांनी ठरवले नाही. मुलांना गुणांच्या ओझ्याखाली आणू नका, आयुष्य बोर्डाच्या निकालांपेक्षा खूप मोठे आहे. आत्मपरिक्षण करून पाहायला हवं'
In my 12th exams, I got 24 marks in Chemistry - just 1 mark above passing marks. But that didn't decide what I wanted from my life
IAS अधिकाऱ्यानं केलेल्या या ट्वीटला 1.5 हजार लाईक्स आणि 13 हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे. बारावीच्या निकालानंतर त्यांनी खूप मेहनत आणि मन लावून अभ्यास केला. नितीन सांगवान यांनी आयआयटी मद्रासमधून एमबीए केलं आणि त्यानंतर इन्फोसिसमध्ये नोकरीला असताना सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये 28 वा क्रमांक मिळविला आणि सध्या ते अहमदाबाद महानगरपालिकेत उप-नगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.