जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / फ्री..फ्री..फ्री अगदी फ्री! तब्बल 23,000 निरनिराळे कोर्सेस ते ही शून्य रुपयांत; UGC चं तरुणांना मोठ्ठं गिफ्ट

फ्री..फ्री..फ्री अगदी फ्री! तब्बल 23,000 निरनिराळे कोर्सेस ते ही शून्य रुपयांत; UGC चं तरुणांना मोठ्ठं गिफ्ट

 युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) स्कॉलरशिप्स

युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) स्कॉलरशिप्स

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) 23 हजारांहून अधिक उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी नवीन वेब पोर्टल (UGC New Web Portal 23 thousand courses Free) सुरू करणार आहे.

  • -MIN READ Jobat,Alirajpur,Madhya Pradesh
  • Last Updated :

    मुंबई, 30 जुलै: नेहमीच देशभरातील तरुण हे फ्रि कोर्सेस कोणत्या वेबसाईटवर आहेत का हे सर्च करत असतात. तसंच फ्री कोर्सेसमुळे जॉब मिळत नाही हे सुद्धा तक्रार करत असतात. मात्र आता UGC नं देशभरातील तरुणांसाठी एक मोठी खूशखबर दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) 23 हजारांहून अधिक उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी नवीन वेब पोर्टल (UGC New Web Portal 23 thousand courses Free) सुरू करणार आहे. याअंतर्गत या अभ्यासक्रमांमध्ये मोफत शिक्षण मिळणार आहे. यूजीसीने म्हटले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि मुलांची काळजी यासह विविध अभ्यासक्रम आता नवीन वेब पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध असतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी एक नवीन पोर्टल लॉन्च केले जाईल, ज्याचा उद्देश डिजिटल अंतर भरून काढणे आणि देशाच्या दुर्गम भागात उच्च शिक्षणाची पोहोच वाढवणे आहे. एक-दोन नव्हे तब्बल 39 वेळा गूगलने केलं रिजेक्ट; तरीही पठ्ठ्यानं मानली नाही हार आगामी शैक्षणिक सत्र 2022-2023 पासून हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी UGC ने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी (MeitY) करार केला आहे. मंत्रालयाच्या अंतर्गत 7.5 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) आणि स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) केंद्रे कार्यरत आहेत. UGC चे अध्यक्ष एम.जगदेश कुमार म्हणाले, “उच्च शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, UGC विद्यार्थ्यांना इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये डिजिटल संसाधने उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.” CSC चा उद्देश नागरिकांना, विशेषत: ग्रामीण भारतात राहणाऱ्यांना त्यांच्या दारात डिजिटल प्रवेश आणि ई-गव्हर्नन्स सेवा प्रदान करणे हा आहे. देशात बेरोजगारीचं भीषण वास्तव; 1000 मधून फक्त 3 जणांना मिळते सरकारी नोकरी पूर्णतः फ्री असतील कोर्सेस 23 हजारांहून अधिक उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम मोफत उपलब्ध असतील. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये 23,000 पदव्युत्तर अभ्यासक्रम, उदयोन्मुख क्षेत्रातील 137 ‘स्वयम’ सर्वसमावेशक ऑनलाइन खुले अभ्यासक्रम आणि 25 गैर-अभियांत्रिकी ‘स्वयम’ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी UGC पोर्टलवर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात