जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / एक-दोन नव्हे तब्बल 39 वेळा गूगलने केलं रिजेक्ट; तरीही पठ्ठ्यानं मानली नाही हार; 40व्या प्रयत्नात मिळवलं Success

एक-दोन नव्हे तब्बल 39 वेळा गूगलने केलं रिजेक्ट; तरीही पठ्ठ्यानं मानली नाही हार; 40व्या प्रयत्नात मिळवलं Success

Interview मध्ये विचारले जातात 'हे' भयंकर प्रश्न

Interview मध्ये विचारले जातात 'हे' भयंकर प्रश्न

काहींना अगदी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांचा ड्रीमजॉब मिळतो, तर काहींना खूप प्रयत्न करावे लागतात. पण ड्रीम जॉबसाठी तब्बल 40 प्रयत्न केल्याचं तुम्ही ऐकलंय का?

  • -MIN READ Trending Desk Jobat,Alirajpur,Madhya Pradesh
  • Last Updated :

     मुंबई, 28 जुलै-  कोणतीही व्यक्ती एखाद्या फिल्डमध्ये नोकरीवर  लागली की त्या फिल्डमधील सर्वोच्च कंपनीत नोकरी मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. काहींना अगदी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांचा ड्रीमजॉब मिळतो, तर काहींना खूप प्रयत्न करावे लागतात. पण ड्रीम जॉबसाठी  तब्बल 40 प्रयत्न केल्याचं तुम्ही ऐकलंय का? होय, एका व्यक्तीने गुगल या अमेरिकी कंपनीमध्ये त्याचा ड्रीम जॉब मिळवण्यासाठी 39 वेळा अर्ज केले; पण त्याला यश आलं नाही. पण 40व्यांदा अर्ज केल्यावर त्याला नोकरी मिळाली.टायलर कोहेन (याने गुगलमध्ये नोकरीसाठी 39 वेळा अर्ज केला; पण प्रत्येक वेळी त्याला रिजेक्शनला सामोरं जावं लागलं. आता हा कोहेनचा वेडेपणा म्हणा किंवा त्याचा आत्मविश्वास, त्याने 40व्यांदाही अर्ज केला आणि यावेळी त्याने त्याचा ड्रीमजॉब मिळवला. गुगलने त्याला असोसिएट मॅनेजरची नोकरी दिली. टायलर कोहेन याने लिंक्डइनवर ही स्टोरी पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता व्हायरल झाली असून लोक त्यातून प्रेरणा घेत आहेत. टायलर कोहेनने लिहिलं की, “वेडेपणा आणि विश्वास यांच्यामध्ये एक बारीक रेषा आहे, मी अजूनही हाच विचार करतोय की माझ्यामध्ये यापैकी कोणती रेषा आहे. 39 नकार आणि नंतर एक होकार, फायनली Google ने माझी ऑफर स्वीकारली.” टायलर कोहेन हा अमेरिकेतील  सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतो आणि आता तो डूरडाशमध्येअसोसिएट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. 25 ऑगस्ट 2019 रोजी, कोहेनने पहिल्यांदा Google मध्ये अप्लाय केलं होतं. त्याने आतापर्यंतच्या त्याच्या सर्व अप्लिकेशन्सचा एक स्क्रीन शॉट या पोस्टसोबत शेअर केलाय. (हे वाचा: देशात बेरोजगारीचं भीषण वास्तव; 1000 मधून फक्त 3 जणांना मिळते सरकारी नोकरी; गेल्या 8 वर्षांत बिकट स्थिती ) कधीकधी तर कोहेन महिन्यातून दोनदा गुगलला अर्ज पाठवत असे. जून 2020 मध्ये कोरोना पीकवर असतानाही त्याने गुगलमध्ये अर्ज केला होता, मात्र तो रिजेक्ट करण्यात आला होता. कोहेन याची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे. कोहेनने गेल्या आठवड्यात ही पोस्ट टाकली आणि आतापर्यंत हजारो लोकांनी यावर लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. गुगलनेही या पोस्टवर कमेंट करत “कोहेन हा प्रवास कसा होता” अशी विचारणा केली आहे.कोहेनची पोस्ट गेल्या तीन वर्षांतील त्याचे प्रयत्न दर्शवते. कोहेन याची जिद्द, हट्ट किंवा अगदी वेडेपणा काहीही म्हटलं तरीही 39 रिजेक्शन स्वीकारून 40व्यांदा प्रयत्न केला आणि त्याला गुगलमध्ये नोकरी मिळाली. त्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: career , Google , job
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात