Home /News /career /

JEE Advanced: JEE परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम झाला जारी; काय आहेत बदल आणि कुठे बघाल? वाचा

JEE Advanced: JEE परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम झाला जारी; काय आहेत बदल आणि कुठे बघाल? वाचा

JEE Advanced 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी 2023 मध्ये JEE परीक्षेला बसायचे आहे ते जेईईच्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर अपडेट केलेला अभ्यासक्रम तपासू शकतात.

  मुंबई, 11 मे: बारावीनंतर कोणत्याही टेक्निकल आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश (How to get admission in Engineering) मिळवण्यासाठी JEE Mains आणि JEE Advanced परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे असतात. म्हणूनच अनेक विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. आपल्यालाच चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रत्येक विषयाचा जीवतोड अभ्यास करत असतात. यंदा ही परीक्षा लवकरच होणार आहे. मात्र या परीक्षेनंतर JEE Advanced 2022 ही परीक्षा घेतली जाणार आहे. देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE परीक्षा (JEE Advanced Exam) घेतली जाते. इतर प्रमुख प्रवेश परीक्षांप्रमाणेच त्या आयोजित करण्याची जबाबदारीही एनटीएकडे सोपवण्यात आली आहे. तसंच JEE Advanced 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी 2023 मध्ये JEE परीक्षेला बसायचे आहे ते जेईईच्या अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर अपडेट केलेला अभ्यासक्रम तपासू शकतात. मात्र JEE 2022 परीक्षा फक्त जुन्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. NEET UG 2022: रजिस्ट्रेशनसाठी कोणती कागदपत्रं IMP; किती असेल शुल्क; वाचा
  JEE Advanced Exam 2023 मध्ये हे होतील बदल
  JEE Advanced 2023 परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत. JEE Advanced Syllabus मधून काही गोष्टी काढून टाकण्यात आल्या आहेत आणि काही नवीन विषय देखील जोडण्यात आले आहेत. JEE Advanced Exam 2023 च्या अभ्यासक्रमातील बहुतांश बदल भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांमध्ये करण्यात आले आहेत. jeeadv.ac.in या वेबसाईटवर उमेदवार अपडेटेड सिलॅबस बघू शकणार आहेत. राज्याच्या जलसंपदा विभागात 'या' पदांसाठी जागा रिक्त; रिटायर्ड अधिकाऱ्यांना संधी 2022 मध्ये JEE परीक्षा कधी होणार? जेईई मेन 2022 (JEE Mains 2022) चे पहिले सत्र 20 ते 29 जून 2022 पर्यंत चालेल. त्याच वेळी, सत्र 2 ची परीक्षा 21 ते 30 जुलै 2022 या कालावधीत होणार आहे. JEE Advanced Exam 2022 साठी नोंदणी प्रक्रिया 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार 11 ऑगस्ट 2022 पर्यंत JEE Advanced परीक्षेसाठी स्वतःची नोंदणी करू शकतील.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Job

  पुढील बातम्या