जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / मोठी बातमी! UGC NET 2022 परीक्षेचं Admit Card जारी; अशा पद्धतीनं लगेच करा डाउनलोड

मोठी बातमी! UGC NET 2022 परीक्षेचं Admit Card जारी; अशा पद्धतीनं लगेच करा डाउनलोड

अशा पद्धतीनं लगेच करा डाउनलोड

अशा पद्धतीनं लगेच करा डाउनलोड

पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 29 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 सप्टेंबर: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 (विलीन केलेली सायकल) फेज II साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 29 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करताना कोणत्याही उमेदवाराला काही अडचण आल्यास तो/ती 011-40759000 वर संपर्क करू शकतो किंवा ugcnet@nta.ac.in वर ईमेल करू शकतो. UGC NET प्रवेशपत्र 2022 असे करा डाउनलोड सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा. येथे मुख्यपृष्ठावर, “UGC-NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी प्रवेशपत्र डाउनलोड करा” वर क्लिक करा. तुमचे लॉगिन तपशील कळवा आणि सबमिट करा. प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जॉब मिळाला नाही? टेन्शन घेऊ नका; ‘या’ वेबसाईट्स लगेच देतील नोकरी असा करा अभ्यास मागील प्रश्नपत्रिका बघा जर तुम्ही UGC NET 2021 च्या परीक्षेला बसणार असाल तर परीक्षेच्या तयारीसाठी, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे लक्षात ठेवा जेणेकरुन त्यांना कोणत्या विषयातून प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्नांच्या प्रकाराची कल्पना येईल. तसेच कोणते प्रश्न परत परत विचारले जातात याचीही कल्पना येईल. मॉक टेस्टवर लक्ष केंद्रित करा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही नियमित मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे. मॉक टेस्टचा प्राथमिक उद्देश उमेदवारांना परीक्षेच्या पॅटर्नची कल्पना मिळावी, एवढेच नाही तर उमेदवारांना UGC NET मॉक टेस्ट देताना वेळ मर्यादेचे पालन करून टाइम मॅनेजमेंटचा सराव करता येईल. महत्त्वाच्या विषयांची यादी बनवा UGC-NET इच्छुक व्यक्तीने महत्त्वाच्या विषयांची यादी बनवून त्या विषयांतील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे. त्यामुळे त्यांना परीक्षेची तयारी वेगाने करण्यास मदत होईल. महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास आधी केला तर परीक्षा पास करण्यात मदत होऊ शकते. तब्बल 85,000 रुपये पगार तेही मुंबईत; ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता मिळेल जॉब; लगेच करा अप्लाय करंट अफेअर्सवर द्या लक्ष विद्यार्थ्यांना सध्याच्या घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांनी वर्तमानपत्रे रोज वाचावीत. पेपर एक मधील सामान्य ज्ञान विभाग चालू घडामोडींवर आधारित आहे, त्यामुळे जगभरात नक्की काय चालले आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात