जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / युको बँकेत चिफ रिस्क ऑफिसर पदासाठी भरती, पात्रता बघ आणि लगेच करा अप्लाय

युको बँकेत चिफ रिस्क ऑफिसर पदासाठी भरती, पात्रता बघ आणि लगेच करा अप्लाय

युको बँकेत चिफ रिस्क ऑफिसर पदासाठी भरती, पात्रता बघ आणि लगेच करा अप्लाय

या पदासाठी पात्रतेचे निकष, वयोमर्यादा, पगार व निवड प्रक्रिया कशी असेल ते जाणून घेऊयात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 मे:  युको बँकेत तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी चिफ रिस्क ऑफिसरची नियुक्ती केली जाणार आहे. युको बँक रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार निवड झालेल्या उमेदवाराचं नोकरीचं ठिकाण पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता असेल. या पदासाठी पात्रतेचे निकष, वयोमर्यादा, पगार व निवड प्रक्रिया कशी असेल ते जाणून घेऊयात. या संदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. पदाचं नाव व रिक्त जागा युको बँकेत चिफ रिस्क ऑफिसर पदासाठी एक रिक्त जागा भरली जाणार आहे. कार्यकाळ तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने उमेदवाराची निवड केली जाईल. तीन वर्षांनंतर समाधानकारक कामगिरी आणि वर्तनाच्या आधारावर कार्यकाळ आणखी दोन वर्षांसाठी किंवा एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. पण तो वाढवून मागण्याचा अधिकार संबंधित उमेदवाराला नसेल. वयोमर्यादा पदासाठी किमान वयोमर्यादा 45 व कमाल 55 वर्षे आहे. 10वीनंतर थेट NDA ची तयारी करायची आहे? मग तुमच्यासाठी ‘हे’ मिलटरी कॉलेज आहे परफेक्ट; बघा पात्रता पगार निवडलेल्या उमेदवाराला जनरल मॅनेजर इतका पगार दिला जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वेतनातून आयकर कायद्यानुसार कर कापला जाईल. शैक्षणिक पात्रता - ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून फायनॅन्शिअल रिस्क मॅनेजमेंटमध्ये प्रोफेशनल सर्टिफिकेट. - PRMIA इन्स्टिट्युटकडून रिस्क मॅनेजमेंटमध्ये प्रोफेशनल सर्टिफिकेट. 10वी, 12वीनंतर टॉपला न्यायचंय करिअर? मग निकालाची वाट बघू नका; आताच सुरु करा ‘हे’ कोर्सेस इतर पात्रता - सीएफए इन्स्टिट्युटतर्फे चार्टर्ड फायनॅन्शिअल अॅनॅलिस्ट अवॉर्ड विजेता किंवा - इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया द्वारे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती, किंवा परदेशात त्या समतुल्य नियुक्ती मिळालेली व्यक्ती किंवा - इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया किंवा परदेशात त्यात स्तरावरील कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून नियुक्ती. अनुभव - भारतातील किंवा परदेशातील बँक अथवा फायनॅन्शिअल इन्स्टिट्युटमध्ये क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क, ऑपरेशनल रिस्क, लिक्विडिटी रिस्क, इंटरेस्ट रेट रिस्क, इतर पिलर II रिस्क, ऑपरेशन्स आणि ग्रुप एंटिटीजमधून उद्भवणारे रिस्क हँडल करण्याचा अनुभव असावा. - अॅनॅलिटिक्सचं एक्सपोजर हे एक अतिरिक्त अॅडव्हान्टेज असेल. 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल 12,000 जागांसाठी बंपर भरती; करा अप्लाय निवड प्रक्रिया पात्रता आणि अनुभवाच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. अंतिम निवड पात्रता, अनुभव, शैक्षणिक पात्रता तसंच मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल. अर्ज फी या पदासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला 1180 रुपये अर्ज फी भरावी लागेल. ही फी परत केली जाणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज कसा करायचा पात्र व इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज भरू शकतात आणि त्यांचा रीतसर भरलेला अर्ज पाकिटावर ‘Application For The Chief Risk Officer’ असं लिहून General Manager, UCO Bank, Head Office, 4th Floor, H. R. M Department 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal – 700 001 या पत्त्यावर 9 जून 2023 पर्यंत पाठवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात