Home /News /career /

काय सांगता! या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळाली तर Life Set; भरघोस पगार देणारे टॉप जॉब्स; वाचा सविस्तर

काय सांगता! या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळाली तर Life Set; भरघोस पगार देणारे टॉप जॉब्स; वाचा सविस्तर

काही क्षेत्रांमध्ये लाखो रुपये पगार मिळतो

काही क्षेत्रांमध्ये लाखो रुपये पगार मिळतो

भारतात (jobs in India) काही क्षेत्रांमध्ये नोकरी करताना तुम्हाला लाखो रुपये पगार (Top highest paying jobs in India) मिळतो.

    मुंबई, 20 मे: भारतात नोकऱ्यांची काही कमी नाही. मात्र काही क्षेत्रांमध्ये उच्चशिक्षित आणि अंगात योग्य ते गुण असलेल्या तरुणांची गरज असते. जर तुमच्यात हे गुण असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला पगारही (high salary jobs) उत्तम मिळतो. भारतात (jobs in India) काही क्षेत्रांमध्ये नोकरी करताना तुम्हाला लाखो रुपये पगार (Top highest paying jobs in India) मिळतो. हे क्षेत्र नक्की कोणते आहेत याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. डॉक्टर (Doctor) डॉक्टर आणि इंजिनिअर हे देशातील दोन पारंपारिक व्यवसाय आहेत. देशात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. म्हणून त्यांच्यासाठी बर्‍याच संधी आहेत. जरी डॉक्टर आपली प्रॅक्टिस करत असेल तरी ते दर महिन्याला लाखो रुपये कमवतात. शिक्षकांनो, सुवर्णसंधी सोडू नका; मुंबईतील 'या' सरकारी संस्थेत मोठी पदभरती चार्टर्ड अकाउंटंट (CA) चार्टर्ड अकाउंटंटच्या व्यवसायाला कधीच मरण नाही. प्रत्येक कंपनीला सीए (CA) आवश्यक असतो. जे लोक पहिल्याच प्रयत्नात सीए फायनल करतात त्यांना वर्षाला 11-15 लाख रुपये पगार मिळतो. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग (CSE) कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला भारतात सर्वात मोठी मागणी आहे. अ‍ॅमेझॉन (Amazon), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), गूगल (Google) आणि फेसबुक (Facebook) सारख्या टेक कंपन्या मोठ्या संख्येनं पदभरती करतात. एका अनुभव नसलेल्या इंजिनिअरला साधारणतः वर्षाचा पाच ते सात लाख रुपये पगार मिळतो. तुम्हालाही मनासारखा जॉब मिळत नाहीये? चिंता नको; या'स्मार्ट टिप्समुळे मिळेल नोकरी कमर्शियल पायलट (Commercial Pilot) कमर्शियल पायलटच्या नोकरीत पैसे तर आहेतच पण यांच्याकडे आदरानं बघितलं जातं. दर महिन्याकाठी यांना दीड ते दोन लाख रुपये पगार मिळतो.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams, Salary

    पुढील बातम्या