मुंबई, 17 मे: परदेशात शिक्षणासाठी (Study Abroad) जायचं असेल तर आता निरनिराळ्या परीक्षा द्याव्या लागतात. कोणत्याही देशात शिक्षण घ्यायचं (How to study in abroad) म्हंटल तर तिथे शिक्षण घेण्यासाठी एंट्रन्स परीक्षा (Entrance Exams for Study Abroad) द्याव्या लागतात. अशा काही परीक्षांपैकीच एक परीक्षा म्हणजे GRE. Graduate Record Examinations असं या परीक्षेचं पूर्ण (Full form of GRE exam) नाव आहे. कोणत्याही देशात विशेष करून अमेरिकेत शिक्षण (Entrance exams for study in USA) घेण्यासाठी जाताना ही परीक्षा महत्त्वाची असते. जर तुम्हीही परदेशात शिक्षण (How to study in Abroad) घेण्याचा विचार करत असाल तर GRE बद्दल संपूर्ण माहिती (GRE exam full information) असणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला GRE बद्दल सर्व माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
GRE टेस्ट देण्य्साठी पात्रता
GRE परीक्षेत बसण्यासाठी कोणतीही विशिष्ट अट नाही. कोणत्याही वयाची आणि शैक्षणिक पात्रता असलेली व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही ज्या संस्थेत प्रवेशासाठी अर्ज कराल त्या संस्थेच्या शैक्षणिक आणि वय-संबंधित अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.
मुंबईत रस्त्यावर फुलं विकणाऱ्या तरुणीची भरारी; कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश
पेपर 3 तास 40 मिनिटांचा असतो. पेपरमध्ये एकूण सहा विभाग असून तिसऱ्या विभागाच्या परीक्षेनंतर 10 मिनिटांचा ब्रेक दिला जातो. सामान्यतः GRE साठी संगणक आधारित चाचणी असते परंतु काही परीक्षा केंद्रांवर तुम्ही पेपर आणि पेन मोडमध्ये देखील परीक्षा देऊ शकता.
परीक्षेचा Syllabus
GRE चे दोन स्वरूप आहेत. एक सर्वसाधारण परीक्षा असते तर दुसरी विशिष्ट विषयांची परीक्षा असते. दोन्ही फॉरमॅटसाठी अभ्यासक्रम वेगळा आहे. GRE सामान्य चाचणीमध्ये मौखिक तर्क, परिमाणात्मक तर्क, गंभीर विचार आणि विश्लेषणात्मक लेखन कौशल्ये. GRE विषय चाचणी उमेदवाराच्या विशिष्ट क्षेत्रातील प्रवीणतेचे मूल्यांकन करते.
अशी देता येईल परीक्षा
संगणकावर आधारित GRE चाचणी वर्षभर घेतली जाते. कोणताही उमेदवार दर 21 दिवसांनी आणि वर्षातून पाच वेळा GRE परीक्षा देऊ शकतो. तुम्हाला एखाद्या विशिष्ट तारखेला परीक्षा द्यायची असेल, तर त्यासाठी नोंदणी करण्याच्या उद्देशाने तुम्हाला तुमचे 'GRE खाते' तयार करावे लागेल.
क्या बात है! कमी वेळात जास्त पैसे कमवण्याची संधी देतील 'हे' Part Time Jobs
असं करा रजिस्ट्रेशन
नोंदणीसाठी, उमेदवारांना प्रथम 'माय जीआरई खाते' तयार करावे लागेल. GRE सामान्य चाचणीसाठी नोंदणी करण्याचे चार मार्ग आहेत. ते चार मार्ग म्हणजे ऑनलाइन, फोन, मेल आणि फॅक्स. GRE विषय परीक्षेसाठी ऑनलाइन आणि मेलद्वारे नोंदणी करण्याचे दोनच मार्ग आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Education, Entrance Exams, Exam Fever 2022, Jobs Exams