मुंबई, 11 जुलै: नोकरी शोधणाऱ्यांना आता आपल्या क्षेत्रातल्या कंपन्यांबाबत सहज माहिती उपलब्ध होते. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि आधी काम करत असलेल्या व्यक्ती यांना ते सोशल मीडियावर पाहू शकतात. कशा प्रकारे कंपनीचा रिसर्च करतात, मालकी हक्क घेतात, तसंच खडतर परिस्थितीला कसं सामोरं जातात, हे त्यांच्या विचारांवर अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीची मानसिकता (Mindset) त्याच्यासाठी संधी उपलब्ध करून देते. माझा एक जवळचा मित्र अमितेशची स्टोरी तुम्हाला सांगतो. त्याच्याकडे अफाट कौशल्य आहे आणि भरपूर मेहनत करून त्याने चांगला अनुभव मिळवला आहे; मात्र तरीही गेल्या कित्येक महिन्यांपासून त्याला नवीन नोकरी मिळत नाहीये. कारण, त्याला स्वतःसाठी योग्य जॉब शोधताच (Job seeking tips) येत नाहीये. नोकरी शोधताना तुम्ही काय विचार करून शोधता (Job seeking mindset) हे महत्त्वाचं ठरतं. अमितेशने नोकरी शोधत असतानाच, स्वतःची एखादी संकल्पना राबवण्याचा विचारही करायला हवा. कदाचित त्याला स्वतःचा स्टार्टअप (Start-up) सुरू करता येणार नाही; मात्र त्याच्या मानसिकतेमध्ये मोठा बदल घडेल. त्याची ही मेहनत त्याचे नेतृत्ववगुण आणि व्हिजन दाखवेल, ज्याचा भविष्यात त्यालाच फायदा होईल. Job Inerview: स्वतःबद्दल सांगतानाच अर्धे उमेदवार होतात गारद; असं द्या उत्तर स्टार्टअप की प्रस्थापित?
नोकरीच्या बाबतीत तुमची मानसिकता हा महत्त्वाचा फॅक्टर ठरतो, याबद्दल आपण बोलत होतो. एखाद्या स्टार्टअप कंपनीत अर्ज (Things to Consider while applying at a start-up) करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि एखाद्या प्रस्थापित कंपनीत (Enterprises) अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, हे आता पाहू या.
स्टार्टअप नवीन उमेदवाराची निवड करताना स्टार्टअप कंपन्या वेगळ्या पद्धतीने विचार (Hiring mentality in Start-up companies) करतात. येणाऱ्या उमेदवारामुळे आपल्या कंपनीत काय बदल घडू शकतील याचा ते विचार करतात. ऑपरेशन्स, टेक, मार्केटिंग, सेल्स किंवा ज्या डिपार्टमेंटसाठी भरती सुरू आहे, त्यामध्ये नव्या उमेदवारामुळे दहापट फरक पडेल का, याचा विचार स्टार्टअप कंपन्या करतात. या कंपन्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी भरती करतात. यामध्ये नवजात स्टार्टअप (Nascent Start-ups), ग्रोथ स्टेज आणि हायपर ग्रोथ यांचा समावेश होतो. नवजात स्टार्टअप कंपन्या केवळ एका संकल्पनेतून सुरू झालेल्या असतात. त्यांच्याकडे एक कोअर टीम आणि कदाचित काही फंडिंग असू शकतं. त्यांचं बिझनेस मॉडेल हे तयार होत असते, जे सुरुवातीच्या काळात टीममध्ये येणाऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरतं. अशा नोकरीसाठी उमेदवाराची मानसिकता अधिकाधिक मूल्यवर्धन करण्याची असावी. उमेदवारांची डिग्री, अनुभव यांऐवजी त्यांची योग्यता किती आहे हे पाहून निवड केली जाऊ शकते. अशा प्रकारच्या नोकऱ्या रोमांचक ठरतात. जगभरातल्या काही प्रमुख स्टार्टअप कंपन्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या कर्मचाऱ्यांनी पुढे जाऊन स्वतःच्या कंपन्या सुरू केल्या आहेत. जागतिक दर्जाची उत्पादनं सुरू करण्याची मानसिकता हजारो स्टार्टअप्सना यशाकडे घेऊन गेली आहे. भारतामध्ये आपण पाहू शकतो, की फ्लिपकार्ट (Flipkart) या मोठ्या कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या कर्मचाऱ्यांनी पुढे जाऊन उडान, क्युअरफिट अशा स्वतःच्या कंपन्या सुरू केल्या आहेत. बाहेरच्या देशातल्या अनेक उदाहरणांपैकी पे-पल (PayPal) हे महत्त्वाचं उदाहरण. या कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या कर्मचाऱ्यांनी पुढे जाऊन लिंक्ड-इन, टेस्ला, पॅलंटीर, यू-ट्यूब आणि कित्येक युनिकॉर्न कंपन्या उभारल्या आहेत. स्टार्टअपमध्ये काम करताना तुम्हाला सातत्याने आव्हानांना सामोरं जावं लागतं. नवीन गोष्टी शिकत स्वतःमध्ये सुधारणा घडवाव्या लागतात आणि नेहमीच सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत. प्रस्थापित कंपन्या (Enterprises) प्रस्थापित कंपन्यांमध्ये पद्धतशीर प्रकारे भरती केली जाते. एखादं नवीन उत्पादन तयार करण्यासाठी किंवा असलेलंच उत्पादन अधिक चांगलं करण्यासाठी ते भरती (Hiring Mindset of Established organisations) करतात. या कंपन्यांनी आधीच मोठ्या आव्हानांचा सामना केलेला असतो. त्यामुळे अशा ठिकाणी काम करण्यात रिस्क कमी असते. अर्थात, प्रस्थापित कंपन्यांना वरचेवर स्टार्टअप कंपन्यांच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या कंपन्यादेखील नवीन आणि वेगळ्या प्रकारे विचार करणाऱ्या उमेदवारांच्या शोधात असतात, जे स्टार्टअपशी स्पर्धा करण्यासाठी उत्कृष्ट उत्पादनं बनवतील आणि विकतील. अॅमेझॉन, पे-पल, वॉलमार्ट, सिस्को अशा शंभरहून अधिक कंपन्यांसोबत आम्ही काम करतो. या कंपन्यांमध्येही सर्वोत्कृष्ट उमेदवारांची भरती करण्यावरून चढाओढ सुरू असते. या कंपन्यांच्या मुलाखतींमध्ये तुम्ही काय केलं आहे यापेक्षा तुम्ही काय करणार आहात यावर अधिक भर दिला जातो. हायपर ग्रोथ कंपन्यांमध्येही चांगला परफॉर्मन्स देणाऱ्यांची भरती करणं सुरू आहे, तसंच पार्श्वभूमीची तपासणी करणे ही सामान्य बाब झाली आहे. अशा कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी तुम्ही नवीन गोष्टी शिकणं आणि जुन्या (नकोशा) गोष्टी विसरण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्याही मुलांनी चांगला अभ्यास करावा असं वाटतंय? मग आधी लावा ‘या’ IMP सवयी
जग अधिक वेगाने बदलत आहे. ट्विलिओ, गोजेक, स्विगी आणि पोस्टमन अशा विविध कंपन्या आता तुमचा ऑन-पेपर अनुभव नाही, तर कामाचा किती अनुभव आहे हे पाहून निवड करत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराची मानसिकता भरपूर महत्त्वाची ठरते.
इन्स्टाहायरमध्ये (Instahyre) आम्ही हे समजून घेण्यासाठी तंत्रज्ञान तयार केलं आहे. याच्या मदतीने उमेदवार स्वतःचं व्यक्तिमत्त्व आणि अनुभव या गोष्टींच्या आधारे योग्य नोकरीची निवड करू शकतो. उमेदवाराची विशेष कौशल्यं, गुण आणि ते ज्या कंपनीमध्ये अर्ज दाखल करत आहेत त्या कंपनीचा डीएनए यांचा अभ्यास करून हे निश्चित केलं जातं. एखादा उमेदवार त्याच्या रिझ्युमपुरता मर्यादित नसतो. निवड प्रक्रियेतला पॅटर्न पाहिल्यास लक्षात येतं, की उमेदवाराची पर्सनॅलिटी, मानसिकता आणि विविध असाइनमेंट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन या गोष्टींचा नोकरी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो.