जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Job Inerview: स्वतःबद्दल सांगतानाच अर्धे उमेदवार होतात गारद; मुलाखतीत हमखास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं असं द्या परफेक्ट उत्तर

Job Inerview: स्वतःबद्दल सांगतानाच अर्धे उमेदवार होतात गारद; मुलाखतीत हमखास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं असं द्या परफेक्ट उत्तर

Job Inerview: स्वतःबद्दल सांगतानाच अर्धे उमेदवार होतात गारद; मुलाखतीत हमखास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं असं द्या परफेक्ट उत्तर

हा प्रश्न जरी सोपी वाटत असला तरी गोंधळात टाकणारा आहे. पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै: दरवेळी जॉबच्या मुलाखतीला (Interview tips) जाताना आपण आपल्या मनात काही गोष्टी ठरवून जातो. मुलाखत घेणारे अधिकारी आपल्याला काही कॉमन प्रश्न (Common questions and Answers in job Interview) विचारतात. स्वतःबद्दल सांगायला (Answer of Tell me about yourself) लावतात किंवा तुम्हला आहे जॉब का करायचा आहे याबद्दल विचारतात. या प्रश्नांच्या उत्तरांची आपण तयारी करून जातो. मात्र आजकालचे मुलाखत घेणारे अधिकार अधिक स्मार्ट पद्धतीनं (Smart Interview Techniques) आपल्या कर्मचाऱ्यांना निवडतात, त्यामुळे तुमच्यासमोर काही नवीन आणि गोंधळात टाकणारे प्रश्न येऊ शकतात. पण या सर्व गोष्टींमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे ‘स्वतःबद्दल काही सांगा’. हा प्रश्न जरी सोपी वाटत असला तरी गोंधळात टाकणारा आहे. पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. लक्षात ठेवा की मुलाखत घेणाऱ्यांना या प्रश्नाद्वारे तुमचा वर्तमान, भूतकाळ जाणून घ्यायचा आहे. त्याला भविष्यातील तुमच्या स्वारस्याबद्दल देखील जाणून घ्यायचे आहे. म्हणून तुम्ही या उत्तराची सुरुवात तुमच्या वर्तमानापासून करावी. नंतर भूतकाळ आणि नंतर भविष्य. तुम्ही वर्तमान, कुठे आणि कोणत्या पदावर काम करता ते सांगावे. लक्षात ठेवा की तुमची उत्तरे नोकरीच्या स्वरूपाप्रमाणे असावीत आणि विरुद्ध नसावी. जॉब एके जॉब! प्राध्यापकांसाठी ‘या’ मोठ्या कॉलेजमध्ये बंपर ओपनिंग्स; करा अर्ज अनुभव आणि कौशल्य सांगा या प्रश्नाच्या उत्तरात, तुमचे कौशल्य आणि अनुभव सांगा. उत्तर देताना तुमचे संवाद कौशल्य चांगले असले पाहिजे. त्या गोष्टींवर अधिक लक्ष द्या आणि काम करा, ज्या पदासाठी तुम्ही नोकरीसाठी गेला आहात त्या पदाशी निगडित सर्व स्किल्स त्यांना सांगा. कोणत्याही मुलाखतीच्या सुरुवातीला विचारला जाणारा हा सर्वात सामान्य प्रश्न आहे, जो HR तुम्हाला नक्कीच विचारतो. तसेच, जेव्हा HR ने “मला तुमच्याबद्दल काहीतरी सांगा” असे विचारले, तेव्हा त्याला हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही तुमच्या CV वर नसलेल्या तुमच्याबद्दल आणखी काय सांगू शकता. त्यामुळे तुमची जी माहिती CV मध्ये आहे ती माहिती न देता स्वतःच्या चांगल्या गुणांबद्दल सांगा. अवघ्या 5 दिवसांत जाहीर होणार CBSE चा निकाल? समोर आली लेटेस्ट अपडेट

तुमच्या आवडीबद्दल सांगा

या प्रश्नाद्वारे एचआरला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की, कामाव्यतिरिक्त तुमची आवड काय असेल. तुम्ही तुमच्या टीमसोबत चांगले काम करू शकाल की नाही? प्रतिसादात तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला संगीत किंवा लेखन आवडते, तुम्ही मुलाखतीत खरे बोलत आहात याची खात्री करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात