मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: Interview मध्ये असं द्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, नोकरी होईल पक्की

Career Tips: Interview मध्ये असं द्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, नोकरी होईल पक्की

मनासारखी नोकरी (Tips regarding how to give successful interview) मिळवण्यासाठी त्या क्षेत्रातील ज्ञान आणि क्षमता यासोबतच नोकरीसाठीची मुलाखत हा एक महत्वाचा भाग असतो.

मनासारखी नोकरी (Tips regarding how to give successful interview) मिळवण्यासाठी त्या क्षेत्रातील ज्ञान आणि क्षमता यासोबतच नोकरीसाठीची मुलाखत हा एक महत्वाचा भाग असतो.

मनासारखी नोकरी (Tips regarding how to give successful interview) मिळवण्यासाठी त्या क्षेत्रातील ज्ञान आणि क्षमता यासोबतच नोकरीसाठीची मुलाखत हा एक महत्वाचा भाग असतो.

  • Published by:  desk news

मुंबई, 26 ऑक्टोबर: मनासारखी नोकरी (Tips regarding how to give successful interview) मिळवण्यासाठी त्या क्षेत्रातील ज्ञान आणि क्षमता यासोबतच नोकरीसाठीची मुलाखत हा एक महत्वाचा भाग असतो. अनेकांना तो अडथळा वाटतो, (Interview in an opportunity) मात्र प्रत्यक्षात ती एक संधी असते. जरी एखाद्या गोष्टीतील ज्ञान कमी असेल तरी मुलाखतीत कॉन्फिडन्सच्या जोरावर (Confidence matters in interview) अनेकजण बाजी मारून नेतात आणि इतर उमेदवारांच्या तुलनेत सरस ठरतात.

मुलाखीचं महत्त्व

मुलाखतीत तुमचं व्यक्तीमत्त्व उलगडून दाखवण्याची मोठी संधी प्रत्येकाला मिळते. तुमच्या उत्तम गोष्टी, गुण आणि क्षमता दाखवून मुलाखत घेणाऱ्यावर प्रभाव पाडण्याचं कौशल्य ज्यांच्याकडं असतं, त्यांना वेगवेगळ्या नोकऱ्या इतरांच्या तुलनेत अधिक सहजरित्या मिळताना दिसतात. त्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.

FAQ ची करा वेगळी तयारी

प्रत्येक मुलाखतीत काही ठराविक प्रश्न हमखास विचारण्यात येतात. या प्रश्नांची इंटरनेटवरून आयती मिळणारी उत्तरं तोंडपाठ करण्याऐवजी स्वतः त्यांची उत्तरं तयार करा. त्यामुळे तुमची उत्तरं कृत्रिम वाटणार नाहीत आणि तुम्ही एक प्रामाणिक उमेदवार असल्याची खात्री पटेल.

स्वतःचं मार्केटिंग करण्याची गरज

ऐकायला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. मुलाखतकर्ता जेव्हा तुम्हाला तुमच्याविषयी बोलायला सांगतो, तेव्हा स्वतःमध्ये असणारे गुण, कौशल्य आणि वैशिष्ट्यं यांची खुलेपणानं तुम्हाला स्तुती करता आली पाहिजे. तुमच्यातील चांगली बाजू ठामपणे मांडल्याचा प्रभाव पडतो आणि तुमची निवड होण्याची संधी वाढते.

आत्मविश्वासाने करून द्या ओळख

प्रत्येक मुलाखतीपूर्वी ती घेणाऱ्याकडे आपला बायोडेटा असतोच. मात्र तरीही बहुतांश वेळा मुलाखत घेणारी व्यक्ती देणाऱ्या व्यक्तीला त्याच्याविषयी माहिती द्यायला सांगते. अशा वेळी स्वतःच्या माध्यमिक शिक्षणापासून सर्वोच्च शिक्षणापर्यंतची माहिती आणि त्यानंतर तुम्ही घेतलेल्या विशेष प्रशिक्षणाची माहिती आत्मविश्वासपूर्वक सांगा. माहिती देताना एकही बाब खोटी सांगू नका.

हे वाचा- अंडरवियरमध्ये लपवली सोन्याची पेस्ट, असा फसला ‘OLD STYLE’ तस्करीचा प्रयत्न

अशा वेळी थोडं खोटं बोला

मागच्या नोकरीतील तुमचा अनुभव चांगला नसेल, तरी मुलाखतीत ते सांगू नका. त्यामुळे तुमच्याविषयी वाईट मत होण्याची शक्यता असते. अशा वेळी थोडं खोटं बोलावं लागलं तरी चालेल, मात्र तुमचा प्रभाव कमी करणारं काहीही मुलाखत घेणाऱ्याला सांगू नका.

First published:

Tags: Career, Job