नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : वेळेचा योग्य वापर केला तर खऱ्या अर्थाने जीवनात यश मिळवता येतं. ‘टाइम इज मनी’ अशी एक फार जुनी आणि प्रसिद्ध म्हण आहे. याचा सोप्या भाषेत अर्थ म्हणजे वेळ हे सर्वांत मोठं भांडवल आहे. पण कॉलेजमध्ये असताना अनेक विद्यार्थी त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त मिळणार जादाचा वेळ हा ‘टाइमपास’ करून वाया घालवतात. पण या वेळेचा सदुपयोग केल्यास त्याचा त्यांना भविष्यातसुद्धा फायदा होऊ शकतो. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना काही विद्यार्थ्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीत पॉकेट मनी काढण्यासाठी त्यांना अभ्यासासोबतच काम करावं लागतं. त्याचबरोबर काही विद्यार्थी असे आहेत की, ज्यांना अभ्यासानंतर थोडा मोकळा वेळ मिळतो. अशा वेळी काम करून पैसे कमवण्यासोबतच प्रॅक्टिकल ज्ञान मिळवणंही ते अधिक पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ‘पार्ट टाइम जॉब’बाबत सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही पैसे कमवतालच पण तुमच्या वेळेचा सदुपयोगही करू शकाल. ब्लॉगिंग ब्लॉगिंग कोणीही सुरू करू शकतो. हे एक असं व्यवसाय क्षेत्र आहे, ज्यासाठी किमान गुंतवणूक आवश्यक आहे. जर कोणाकडे लिखाणाची कला असेल, तर त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल. तुम्ही यामध्ये पेड रिव्यू किंवा संपादकीय लिहिणंदेखील सुरू करू शकता. मात्र, त्यात सुरुवातीला फारसा नफा मिळत नाही. रिफ्युज रिमूव्हल बहुतेक कंपन्यांना त्यांच्या कंपनीतील कचरा साफ करण्यासाठी लोकांची गरज असते. जर कोणाकडे काही स्वस्त उपकरणं आणि एखादा जुना ट्रक घेण्यासाठी काही पैसे असतील, तर तो स्थानिक कंपन्यांशी संपर्क वाढवून हे काम करू शकतो. या सेवेसाठी तुम्ही कंपनीकडून प्रतितास दराने पैसे घेऊ शकता. यामुळे जमा झालेला कचरा रिसायकल करून पर्यावरण संवर्धनासाठीही मदत होईल. हे वाचा - इथे प्रवेश मिळाला तर लाईफ सेट; NIRF रँकिंगनुसार ‘हे’ आहेत राज्यतील टॉप कॉलेजेस फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंगद्वारे तुम्ही तुमच्या हिशेबानं विविध क्लायंटसाठी काम करू शकता. फ्रीलान्सिंगमध्ये तुमचं स्किल वापरून तुम्ही पोर्टफोलिओदेखील तयार करू शकता. यामध्ये ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया मॅनेजर, वेब डिझायनिंग, कॉपी रायटिंग यासारख्या कामात चांगले पैसे कमवता येतात. हे वाचा - सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी खूशखबर; SSC करणार तब्बल 73,333 पदांसाठी भरती कॉलेज करताना अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासानंतर थोडाफार मोकळा वेळ मिळतो. बरेच विद्यार्थी या वेळेचा वापर योग्य पद्धतीने करत नाहीत. पण कॉलेज जीवनात मिळणाऱ्या या मोकळ्या वेळेचा सदुपयोग केल्यास थोडेफार पैसे तर मिळतीलच, शिवाय भविष्यात स्वतःचं करिअर घडवतानासुद्धा त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.