मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Best Pharmacy Colleges: इथे प्रवेश मिळाला तर लाईफ सेट; NIRF रँकिंगनुसार 'हे' आहेत राज्यतील टॉप कॉलेजेस

Best Pharmacy Colleges: इथे प्रवेश मिळाला तर लाईफ सेट; NIRF रँकिंगनुसार 'हे' आहेत राज्यतील टॉप कॉलेजेस

'हे' टॉप IIT मधील भन्नाट कोर्सेस

'हे' टॉप IIT मधील भन्नाट कोर्सेस

राज्यातील फार्मसीचे बेस्ट कॉलेजेस कोणते? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 ऑक्टोबर: कोरोनामुळे संपूर्ण जगभरात औषधांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सर्व फार्मसी क्षेत्रातही कंपनी आणि कर्मचारी जोमात आहेत. अनेक वर्ष विद्यार्थ्यांचा कमी कल असलेल्या फार्मसी क्षेत्राला पुन्हा उभारी मिळाली आहे. मात्र हे फार्मसी क्षेत्र नक्की आहे तरी काय? आणि या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी कशा मिळतील? यासाठी या क्षेत्रात नक्की कसं शिक्षण घ्यावं? तसंच राज्यातील फार्मसीचे बेस्ट कॉलेजेस कोणते? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

फार्मसीचा थेट संबंध औषधांशी आहे फार्मसीमध्ये औषध बनवण्याची पद्धत, कोणत्या रोगासाठी कोणते औषध आहे, औषधाचे प्रमाण, कोणते औषध सोबत घेऊ नये, आदी कामे फार्मसीअंतर्गत येतात. जर तुम्हाला फार्मसीमध्ये करिअर करायचे असेल तर तुम्हाला बी.फार्म (B.Pharma), एम.फार्म (M.Pharma) किंवा इतर काही डिप्लोमासारखे पदवी अभ्यासक्रम करावे लागतील.

RRB Group D: परीक्षा तर झाली पण आता पुढे काय? असे असतील फिझिकल आणि मेडिकल टेस्टचे निकष

NIRF रँकिंगनुसार महाराष्ट्रातील बेस्ट फार्मसी कॉलेजेस

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी

ही संस्था महाराष्ट्रातील मुंबई शहरात आहे. ज्याची स्थापना 1 ऑक्टोबर 1993 रोजी झाली. 2008 मध्ये, भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने ते डीम्ड विद्यापीठ म्हणून स्वीकारले. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) ने या संस्थेला A++ दर्जा दिला आहे. NIRF नुसार फार्मसी महाविद्यालयांमध्ये तिचा क्रमांक 7 आहे.

बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी

ही संस्था महाराष्ट्रातील मुंबई शहरातही आहे. ही संस्था फार्मसी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रातील अव्वल संस्थांपैकी एक आहे. त्याची स्थापना 1957 मध्ये झाली. NIRF नुसार या संस्थेचे मानांकन 32 आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

ही देशातील सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. ही संस्था महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. या विद्यापीठाची स्थापना 1923 मध्ये झाली. NIRF नुसार या संस्थेचे रँकिंग 42 आहे.

सौ किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी

हे नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. या संस्थेची स्थापना 1985 मध्ये झाली. या संस्थेला नॅशनल असेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिल (NAAC) द्वारे ए ग्रेड मिळाला आहे. NIRF नुसार या संस्थेचे मानांकन 53 आहे.

महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये 75,000 रुपये सॅलरी; 'ही' महापालिका ग्रॅज्युएट उमेदवारांच्या शोधात

काय पात्रता आहे आवश्यक

ज्या उमेदवारांना महाराष्ट्रातील फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी पीसीएम/पीसीबीमधून १२ वी किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यासोबतच ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्टच्या संख्येनुसार संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो.

First published:

Tags: Career, Career opportunities, Education, Maharashtra News