मुंबई, 18 जून: महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजेच MPSC. दरवर्षी या परीक्षेला राज्यातील लाखो उमेदवार बसतात. अनेकांना परीक्षा दिल्यानंतर स्वतःच्या मेहनतीवर अधिकारी बनण्याची संधीही (MPSC Success story) मिळते. मात्र हे संधी मिळण्यासाठी अतोनात परिश्रम आणि मेहनत (Efforts required to crack MPSC) घ्यावी लागते. जीवाचं रान करून अभ्यास करावा लागतो. तसंच काही विद्यार्थी यासाठी निरनिराळ्या प्रकारचे क्लासेसही (Best Classes for MPSC Preparation) लावतात. या क्लासेसचं शुल्क लाखोंच्या घरात असतं. प्रत्येक उमेदवाराला ते परवडेलच असं नाही. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला MPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या (How to study smartly for MPSC) आणि त्यासंबंधीची तयारी करण्याच्या काही टिप्स (Tips and Tricks to crack MPSC in Single attempt) देणार आहोत. विशेष म्हणजे या टिप्स वापरून तुम्ही घरबसल्या अभ्यास करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. करंट अफेअर्सचा अभ्यास आवश्यक फक्त MPSC च नाही तर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करताना परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत चालू घडामोडींची माहिती ठेवा. MPSC परीक्षेत चालू घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने दररोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी तसंच ऑनलाईन करंट अफेअर्सच्या काही टेस्टही द्याव्यात. 11वी प्रवेशासाठी नोंदणी केलीत ना? मग दुसऱ्या टप्प्याची सुरु करा तयारी; घ्या Link अभ्यास करताना आत्मविश्वास ठेवा अनेकदा तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकाल की नाही हे तुमच्यातील आत्मविश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे अभ्यास करताना किंवा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास ढासळू देऊ नका. तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा. सुरुवातीला Syllabus समजून घ्या सर्वप्रथम MPSC परीक्षेचा अभ्यासक्रम (MPSC Exam Syllabus) समजून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे अभ्यासाचा आराखडा तयार करण्यात मदत होते. यासाठी तुम्हाला MPSC कन्या ऑफिशिअल साईटवरून परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करावा लागेल. सिलॅबस मिळाल्यानंतर अभ्यासाची तुमची एक चेकलिस्ट तयार करा. या चेकलिस्टनुसार अभ्यास करत राहा. परिस्थितीमुळे शिक्षण सोडलं पण जिद्द नाही; महिलेनं वयाच्या 53 वर्षी केली ‘दसवीं’
गेल्या काही वर्षांचे पेपर महत्त्वाचे
MPSC ची तयारी करणाऱ्या प्रत्यके उमेदवाराने मागच्या काही वर्षांचे पेपर सोडवून बघणं खूप महत्त्वाचं आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की कोणत्या विषयांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. यासोबतच कमी महत्त्वाच्या विषयांचीही माहिती मिळेल. पेपर पॅटर्न समजून घेण्यासाठी किमान 10 वर्षांचे पेपर सोडवा. हे आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत करेल.