मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IBPS Calendar 2021: बँकेत नोकरीची संधी, कधी होणार परीक्षा? पाहा वेळापत्रक

IBPS Calendar 2021: बँकेत नोकरीची संधी, कधी होणार परीक्षा? पाहा वेळापत्रक

RRB, PO, Clerk या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचं काम आयबीपीएस करते, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात (Banking sector) काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी या परीक्षा महत्त्वाच्या असतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 21 मे : आयबीपीएस (Institute of Banking Personnel Selection, IBPS) बँकिंग क्षेत्रात नोकरी (Job) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची भरती करणारी संस्था आहे. ही संस्था बँकिंग क्षेत्राशी संबंधित विविध पदांसाठी लेखी परीक्षांचं आयोजन करते. 1975 मध्ये स्थापन झालेल्या आयबीपीएस या संस्थेकडे बँकेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी आहे. RRB, PO, Clerk या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचं काम आयबीपीएस करते, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात (Banking sector) काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी या परीक्षा महत्वाच्या असतात.

इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्यावतीने(Institute of Banking Personnel Selection, IBPS) घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक आयबीपीएसने 3 फेब्रुवारीला प्रसिद्ध केलं होतं. या वेळापत्रकात आरआरबी, पीओ, क्लार्क आणि एसओ या पदासांठीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा देण्यात आल्या आहेत. जे उमेदवार या परीक्षांची तयारी करत आहेत ते आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर ibps.in परीक्षेचं पूर्ण वेळापत्रक तपासू शकतात.

वेळापत्रकानुसार आयबीपीएस क्लार्क पदासाठीची प्रीलिम परीक्षा 28, 29 ऑगस्ट तसंच 4 व 5 सप्टेंबर 2021 ला होणार आहे. त्याची मेन्स परीक्षा 31 ऑक्टोबरला होईल. आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर (PO) प्रीलिम्स परीक्षा 9, 10, 16 आणि 17 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे. त्याची मेन्स परीक्षा 27 नोव्हेंबर 2021 ला होणार आहे. त्याचबरोबर आयबीपीएस विशेषज्ञ अधिकारी पदासाठीच्या प्रीलिम्स परीक्षा 18 व 26 डिसेंबर, 2021 ला आयोजित केली आहे. या पदाची मेन्स परीक्षा 30 जानेवारी 2022 ला होणार आहे. आयबीपीएस आरआरबी (IBPS RRB) पदासाठी प्रीलिम परीक्षा 1, 7, 8, 14 आणि 21 ऑगस्ट 2021ला होणार असून त्या पदासाठीची मेन्स परीक्षा 25 सप्टेंबर व 3 ऑक्टोबर 2021 ला होणार आहे.

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नोकरी शोधणं हे अवघड काम होऊन बसलं आहे. तरीही जे पात्रता पूर्ण करतात ते उमेदवार बँकिग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी आयबीपीएसची परीक्षा देऊ शकतात. लेखी परीक्षेनंतर त्यांची निवड प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकलात आणि यशस्वी झालात तर सरकारी नोकरी तुमची वाट पाहeतच आहे. सरकारी नोकरी मिळाली तर सोन्याहून पिवळं. त्यामुळे हे वेळापत्रक नीट पeहा. त्यानंतर आयबीपीएसच्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी दिलेली माहिती पूर्ण वाचा आणि त्यानुसार अर्ज करा. या परीक्षेसाठी कसून अभ्यास करा आणि बना बँक अधिकारी.

First published:

Tags: Bank exam, Job alert, Jobs