मुंबई, 10 ऑक्टोबर: जगात चित्रविचित्र गोष्टी अमाप आहेत. तसंच चमत्कृतीपूर्ण गोष्टी करणारेही खूप आहेत. आपल्या चित्रविचित्रपणातून लोकांचं लक्ष वेधणं हाच अशांचा हेतू असतो. अनेकजण बॉसला घाबरतात. बॉससमोर काही बोलायचीही हिंमत होत नाही. पण कधी एखादी नोकरी भीतीदायक असू शकते? चक्रावून गेलात ना. जाणून घेऊयात या भीतीदायक नोकरीबद्दल अधिक माहिती. या बद्दलचं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. लंडनमध्ये अशा एका नोकरीसाठी भरती सुरू आहे. तुमच्या शौर्याचीच इथे परीक्षा पाहिली जाते. ‘द डंजन्स’ नावाच्या कंपनीत भरती सुरू आहे; तसंच हे जगातलं सगळ्यात भीतीदायक, घाबरवणारं काम आहे असं कळतंय. ब्रिटनची राजधानी लंडनमधील ब्लॅकपूल, एडिनबर्ग आणि योर्क या भागांत ‘द डंजन्स’चा भूत बंगला आहे. जिथे तुमची भेट लंडनमधील काही भीतीदायक पात्रांशी घडवली जाते. ही पात्रं सादर करणारी माणसं मुळात अभिनेतेच आहेत. या कंपनीला त्यांच्या शोसाठी अधिकृत स्केअर टेस्टरची गरज आहे. ज्या व्यक्तीचे काम हेच असेल की शोमध्ये सहभागी होणारे लोक प्रचंड घाबरले पाहिजेत. कंपनीचा मुख्य हेतू हा शोचा थरार वाढवणं इतकाच आहे. फ्रेशर्ससाठी मोठी खूशखबर! ‘ही’ नामांकित IT कंपनी तब्बल 5000 जागांवर करणार भरती काय काम असेल स्केअर टेस्टरचं स्केअर टेस्टर म्हणून नेमणूक झालेल्या व्यक्तीला द डंजन्सच्या टूरिस्ट शाखांमध्ये पाठवलं जाईल. हॅलोविनचे निमित्तसाधून आपल्या भीतीदायक अनुभवांची नोंद करायची हे तिचं काम असेल. या व्यक्तीला नंतर द डंजन्सच्या चार साईटसवर जावं लागेल. एडिनबर्गवर नेमणूक झालेल्या व्यक्तीला ‘डिनर ऑन द डेड इव्हेंट’ चा सामना करावा लागेल. या ठिकाणी पर्यटकांना जेवणासाठी बोलावलं जाईल. पण सभोवतालचं वातावरण हे प्रचंड भीती निर्माण करणारं असेल. ज्यात भूतं आणि माणसांमधला फरक दाखवणं अवघड होईल. स्केअर टेस्टरला लंडनस्थित एका भूत बंगल्यात पाठवलं जाईल. इथे एका भयावह कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. जिथे भुतांना वश करण्याचं काम होईल. योर्क भागातही अशाच स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. ब्लॅकपूल येथे ग्रीम रीपरच्या संकल्पनेवर कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात ती व्यक्ती हातात हत्यार घेऊन लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करेल. एकूणात स्केअर टेस्टरने शोमध्ये उपस्थित असणार्या लोकांचा थरकाप उडेल याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी स्केअर टेस्टरला हे सगळे पहिल्यांदा स्वत: अनुभवणं आवश्यक आहे. स्केअर टेस्टरने स्वत:च्या भित्रेपणाची चाचणी देणं यासाठी महत्त्वाचं ठरतं. SBI PO Recruitment: 68,000 रुपये पगार अन् सरकारी नोकरी; अर्जाचे शेवटचे 2 दिवस भयावह कथा येणार पुन्हा समोर
या वर्षी आम्ही मोठी योजना आखली आहे. आमचे हॅलोवीनचे शोज हे स्थानिक इतिहासाचा भाग असतील. ज्यात भयावह आणि भूतकथांना पुनरुज्जीवित केलं जाईल. या वर्षी आमच्याकडल्या पर्यटकांपैकी एकाला आम्ही आमचा सगळ्यात भीतीदायक शो पाहण्याची संधी देत आहोत, असं एडिनबर्ग शाखेच्या जनरल मॅनेजर कॅथरीन एंजल यांनी म्हटलंय. त्या पुढे म्हणाल्या, ऑक्टोबर महिन्यात सगळ्या उमेदवारांना प्रत्येक शोला पाठवलं जाईल. स्केअर टेस्टरसाठी अर्ज करणारा उमेदवार हा खूपच शूर असावा, ज्याने आमचे चारही शोज पाहावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही आशा करतो की, अर्ज करणारे उमेदवार शूरच असतील असंही त्या म्हणाल्या.