मुंबई, 10 ऑक्टोबर: स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांची यंदाच्या वर्षातली उमेदवार भरती मोहीम जाहीर केली आहे. त्यातून परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची (अर्थात PO) 1673 पदं भरली जाणार आहेत. त्यासाठी PO परीक्षा 2022 आयोजित केली जाणार आहे. स्टेट बँकेत नोकरी करून महिना 68 हजार रुपये कमावण्याची संधी इच्छुक आणि पात्र उमेवारांनी सोडू नये. अर्जाची तारीख, पात्रता, अधिसूचना आणि इतर माहितीबाबत जाणून घेऊया. या पदांसाठी भरती प्रोबेशनरी ऑफिसर (PO) एकूण जागा - 1673 शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. जे त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात/सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील या अटीच्या अधीन राहून तात्पुरते अर्ज करू शकतात. मुलाखतीसाठी बोलावल्यास, त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. चार्टर्ड अकाउंटंट प्रमाणपत्र असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी खूशखबर! तब्बल 92,000 रुपये महिना पगाराची नोकरी
किती मिळणार पगार
प्रोबेशनरी ऑफिसर (PO) - 65,780/- - 68,580/- रुपये प्रतिमहिना कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा
SBI PO Recruitment 2022 |
---|
प्रवर्ग |
SC |
ST |
OBC |
EWS |
GEN |
एकूण |
इतकं असेल परीक्षा शुल्क खुल्या प्रवगासाठी आणि इतरांसाठी - 750/- रुपये SC/ST/PWD प्रवर्गांसाठी - शुल्क नाही आता जेवण ऑर्डर करण्यासह घरबसल्या करा Zomato मध्ये नोकरी; ग्रॅज्युएट्ससाठी 2.94 लाख सॅलरी काही महत्त्वाच्या तारखा
SBI PO प्रोग्राम | तारखा |
---|---|
SBI PO अधिसूचना 2022 | 21 सप्टेंबर 2022 |
ऑनलाइन नोंदणी | 22 सप्टेंबर 2022 पासून सुरू |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 ऑक्टोबर 2022 |
शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 12 ऑक्टोबर 2022 |
पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचे आयोजन | नोव्हेंबर 2022/डिसेंबर 2022 |
SBI PO प्रवेशपत्र 2022 (प्राथमिक) | डिसेंबर 2022 चा पहिला/दुसरा आठवडा |
SBI PO 2022 परीक्षेची तारीख- प्राथमिक | 17/18/19/20 डिसेंबर 2022 |
SBI PO 2022 परीक्षेची तारीख | मुख्य जानेवारी 2023 / फेब्रुवारी 2023 |
मुलाखतीचे आयोजन | फेब्रुवारी / मार्च 2023 |
अंतिम निकालाचा महिना | मार्च 2023 |
अशी असेल सिलेक्शन प्रोसेस SBI PO भरती परीक्षा ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक परीक्षांमध्ये सर्वात प्रमुख परीक्षा आहे. IBPS द्वारे घेतलेल्या बँक प्रवेश परीक्षांच्या तुलनेत हे थोडे कठीण मानले जाते. SBI मधील प्रोबेशनरी ऑफिसर्ससाठी भरती प्रक्रियेमध्ये 3 टप्पे असतात: प्राथमिक परीक्षा मुख्य परीक्षा GD/मुलाखत अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी www.sbi.co.in या लिंकवर क्लिक करा.