जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 'हे' आहेत भारतातील सर्वात जास्त पगार देणारे टॉप सेक्टर्स; पगार बघून व्हाल थक्क

'हे' आहेत भारतातील सर्वात जास्त पगार देणारे टॉप सेक्टर्स; पगार बघून व्हाल थक्क

'हे' आहेत भारतातील सर्वात जास्त पगार देणारे टॉप सेक्टर्स; पगार बघून व्हाल थक्क

पगार बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

4मुंबई, 09 ऑगस्ट: आजकालच्या काळात नोकरी (Latest Jobs) आणि पगार (Salary) हे जणू समीकरणच झालं आहे. कोणतीही नोकरी करायची म्हंटलं की त्यात पगार किती मिळतो याबाबत आपल्याला नक्कीच उत्सुकता असते. मात्र तुम्हाला भारतातील काही टॉप सेक्टर्सबद्दल माहिती आहे का? ज्यामधील पगार बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.  चला तर मग जाणून घेऊया. FMCG सेक्टर (FMCG Sector) अलीकडेच एक सर्वेक्षण समोर आले आहे, ज्यात देशातील एफएमसीजी क्षेत्रात सर्वाधिक रक्कम उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. या क्षेत्रातील सरासरी वार्षिक सीटीसी 11.3 लाख रुपये आहे 10 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार देण्याच्या श्रेणीमध्ये 30 टक्के नोकऱ्या या क्षेत्रात आहेत. यामुळे हे क्षेत्र इतर सर्वांपेक्षा पुढे आहे. हे क्षेत्र सातत्यानं वाढत आहे आणि आगामी काळात देखील या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील असा अंदाज आहे. पॉवर सेक्टर (Power Sector) FMCG नंतर पॉवर सेक्टर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वेक्षणानुसार, सर्व स्तरांवर आणि कामावर या क्षेत्रातील सरासरी वार्षिक वेतन 9.8 लाख रुपये आहे. पॉवर क्षेत्र देखील सतत वाढत आहे, ज्यामुळे दरवर्षी हजारो तरुणांना या क्षेत्रात रोजगार मिळतो. रँडस्टॅडने हे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणात विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेला पगार सांगितला आहे. हे वाचा - इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटला जगात मोठी मागणी; मिळतो लाखो रुपये पगार IT सेक्टर (IT Sector) कोरोनानंतर या क्षेत्रात सर्वाधिक नोकर्‍याही उपलब्ध होत आहेत. पण IT क्षेत्र या सर्वेक्षणात तिसऱ्या क्रमांकावर आहे. IT क्षेत्रात काम करणाऱ्यांना वार्षिक सरासरी 9.3 लाख रुपये पगार मिळतो. आयटी कॅपिटल बंगळुरू संपूर्ण देशात सर्वाधिक पगार देते. इथे वार्षिक वेतन 14.6 लाख रुपये आहे. फार्मा सेक्टर (Pharmacy Sector) फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्र वेतन देण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे, सरासरी वार्षिक वेतन 8.8 लाख रुपये आहे. मात्र, कोरोनामुळे, या क्षेत्रात पगाराची वाढ वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jobs , Salary
  • First Published :
जाहिरात
जाहिरात