Home /News /career /

इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटला जगात मोठी मागणी; मिळतो लाखो रुपये पगार; बघा याबद्दल संपूर्ण माहिती

इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटला जगात मोठी मागणी; मिळतो लाखो रुपये पगार; बघा याबद्दल संपूर्ण माहिती

आज आम्ही तुम्हाला इंटरनॅशनल बिझनेस या कोर्सबद्दल आणि त्यासंबंधीच्या काही प्रवेश परीक्षांबाबत माहिती देणार आहोत.

    मुंबई, 09 ऑगस्ट: व्यवसाय म्हणजे बिझनेसला (Business) या जगात प्रचंड मागणी आहे. विशेषतः कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानंतर अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यात इंटरनॅशनल बिझनेसमध्ये (International Business) भरघोस पैसे आहेत आणि चांगल्या पगाराची नोकरीही आहे. भारतातही इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटचे (International business Management) कोर्सेस अनेक कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये उपलब्ध आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला इंटरनॅशनल बिझनेस या कोर्सबद्दल आणि त्यासंबंधीच्या काही प्रवेश परीक्षांबाबत माहिती देणार आहोत. इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्या ओळखण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट कामात येते. याव्यतिरिक्त ग्राहकांना यजमान देशाच्या व्यवसाय अटी समजून घेण्यास मदत करणं आणि व्यवसायाचं काम सुलभ करणं जेणेकरून परदेशी व्यवसाय ग्राहक आपल्या देशात गुंतवणूक करण्यास तयार होतील असे काम इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजर करतात. इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटसाठी एंट्रन्स परीक्षा NMAT (UG): NMIMS व्यवस्थापन अभियोग्यता चाचणी (पदवीधर) GGSIPU CET: गुरु गोबिंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ सामान्य प्रवेश परीक्षा डीयू जेट: दिल्ली विद्यापीठ संयुक्त प्रवेश परीक्षा ख्रिस्त विद्यापीठ बीबीए प्रवेश परीक्षा CET सिम्बायोसिस प्रवेश परीक्षा CAT XAT CMAT IIFT SNAP हे वाचा - IIT Bombay Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे इथे नोकरीची संधी किती मिळेल पगार इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजरला साधारणतः अनुभवानुसार 2 ते 15 लाखांपर्यंतच पॅकेज मिळू शकतं. अनुभवानुसार याहून अधिक पगाराची नोकरीही मिळू शकते.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Business, Career opportunities, Education

    पुढील बातम्या