• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • TCS Work from Home: काही कर्मचाऱ्यांना भविष्यात कधीच ऑफिस जाण्याची गरज पडणार नाही; असं का? वाचा

TCS Work from Home: काही कर्मचाऱ्यांना भविष्यात कधीच ऑफिस जाण्याची गरज पडणार नाही; असं का? वाचा

कंपनीनं पॉलिसी (TCS 25x25 Hybrid Model) तयार केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर: देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यानुसार आता काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम (Work From Home) बंद करून त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या कंपनीनं नुकतीच वर्क फ्रॉम होम बंद करण्याची (TCS end of WFH) घोषणा केली आहे. त्यानुसार आता डिसेंबर किंवा जानेवार महिन्यामध्ये TCS आपल्या कर्मचाऱ्यांना परत ऑफिसला बोलावणार आहे. मात्र यात असेही काही कर्मचारी असणार आहेत ज्यांना भविष्यात कधीही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नसणार आहे. यासाठी कंपनीनं पॉलिसी (TCS  25x25 Hybrid Model) तयार केली आहे. यासाठी कंपनीनं हायब्रीड मॉडेल (hybrid model) 25×25 (What is 25x25 hybrid model?) हे मॉडेल विकसित केलं आहे. यानुसार कंपनीतील 25 टक्के कर्मचारी हे 2025 पर्यंत पूर्णतः सुविधांशिवाय काम करणार आहेत. तसंच यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या संपूर्ण वेळचा फक्त 25 टक्के वेळ द्यावा लागणार आहे. ज्या मॉडेलनं TCS साठी कार्यालयांमधून काम सुरळीत केलं आहे ते 2025 पर्यंत त्याच्या 25 टक्के सहकाऱ्यांना कोणत्याही क्षणी सुविधांबाहेर काम करण्यास भाग पाडणार आहे.  तसंच कर्मचाऱ्यांना त्यांच्या 25 टक्केपेक्षा जास्त वेळ खर्च करण्याची गरज भासणार नाही. याचा लाभ गृहिणींना आणि स्त्रियांना मिळणार आहे ज्या आपलं काम घरचं काम पूर्ण करतानाही नोकरी करू शकणार आहेत. हे वाचा - Central Railway Recruitment: मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 39,100 रुपये मिळणार पगार 2025 पर्यंत कंपनीच्या केवळ 25 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालय परिसरातून काम करावे लागेल आणि त्या 25 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा फक्त 25 टक्के वेळ खर्च करावा लागेल. आमचे ग्राहक या मॉडेलला घेऊन उत्साही आहेत. यामुळे आम्हाला एक ठळक नवीन व्हिजन 25 × 25 लाँच करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. या मॉडेल अंतर्गत, कंपनीत 2025 पर्यंत कार्यालयातून फक्त 1.12 लाख कर्मचारी काम करण्याची अपेक्षा आहे असं TCS चे CEO राजेश गोपीनाथन यांनी सांगितलं आहे. TCS कडून 25 × 25 लाँच करण्यात आल्यामुळे इतर आयटी कंपन्या याचं अनुसरण करतील आणि हीच योजना वापरतील अशी शक्यता आहे. यामुळे कंपन्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च वाचणार आहे. तसंच कर्मचाऱ्यांना आपल्या सोयीनुसार काम करता येणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: