• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • MH 10th Board exam 2022: इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी 18 नोव्हेंबरपासून स्वीकारले जाणार अर्ज; शिक्षणमंत्र्यांची माहिती

MH 10th Board exam 2022: इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी 18 नोव्हेंबरपासून स्वीकारले जाणार अर्ज; शिक्षणमंत्र्यांची माहिती

18 नोव्हेंबर 2021 पासून अर्ज (Application form for 10th exam 2022) स्वीकारण्यात येणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  • Share this:
    मुंबई, 17 नोव्हेंबर: राज्यात कोरोनामुळे 2021 च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. मात्र आता वर्ष 2022 साठी इयत्ता दहावीच्या परीक्षा (Maharashtra 10th board Exams 2022) ऑफलाईन होणार आहेत. त्यानुसार आता शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्यात आली आहेत. इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी (10th exam 2022 Maharashtra state board) आता उद्यापासून म्हणजेच येत्या 18 नोव्हेंबर 2021 पासून अर्ज (Application form for 10th exam 2022) स्वीकारण्यात येणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसंच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज करण्याचा कालावधी जारी केलेल्या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह 18 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज करायचे आहेत. तर विलंब शुल्कासह हे अर्ज 20 डिसेंबर ते मंगळवार 28 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येणार आहेत. तसंच उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 18 नोव्हेंबर 2021 ते 30 डिसेंबर 2021 इतका असणार आहे. Maharashtra Schools: पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट या वेबसाईटद्वारे करा अर्ज वर्ष 2022 च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर (Website for Application form for 10th exam 2022) जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. परीक्षा शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पेमेंट पर्यायांचा वापर करता येणार आहे. शिक्षणमंत्र्यांनी केलं हे आवाहन इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी आवेदनपत्र भरण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र भारण्याचा आवाहन केलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरण्यास सोपं जाणार आहे.
    First published: