जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / अपघातात गमावला पाय आणि दोन्ही हात, जिद्दीने झाला सहाय्यक मॅनेजर, वाचा तरुणाची यशोगाथा

अपघातात गमावला पाय आणि दोन्ही हात, जिद्दीने झाला सहाय्यक मॅनेजर, वाचा तरुणाची यशोगाथा

रोशन नगर

रोशन नगर

तुमचं दु:ख कितीही मोठं असलं तरी या तरुणापेक्षा नक्कीच नसेल, त्याच्या जिद्दीला आणि हिमतीला सलाम!

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्‍ली : लहान असताना दोन्ही हात व एक पाय गमावणाऱ्या तरुणाने हिंमत न हारता संघर्ष केला आणि आज त्याची कहाणी अनेकांना प्रेरणा देत आहे. त्याचा अपघात, हिंमत एकवटून परिस्थितीला सामोरं जात आयुष्यात केलेली कामगिरी आपण आज जाणून घेणार आहोत. राजस्थानमधील या तरुणाचं नाव रोशन नागर आहे. रोशन लहानपणी घराच्या छतावर आलेला पतंग पकडायला काठी घेऊन गेला. पण काठी लहान असल्याने त्याने लोखंडी रॉड उचलला. तो रॉड 36 KV हाय-टेन्शन तारांच्या संपर्कात आला आणि रोशनला विजेचा जोरदार झटका बसला. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचे दोन्ही हात व एक पाय कापला. शरीरावरील जखमांवर उपचार सुरू होते, पण खरा संघर्ष बाकी होता. अशातच कोणीतरी त्याला विचारलं की ‘आता तर तुला आयुष्यभर असंच राहायचंय, तू काय करशील?’. यावर विचार करत असताना त्याच्या एका मित्राने कापलेल्या हातानेच पेन पकडून लिहिण्याचा सल्ला दिला. रोशनला कल्पना आवडली, सरावाने तो तीन-तीन तास लिहू लागला. रोशनने 10 वी व 12 वीची परीक्षा कुणाचीही मदत न घेता पास केली होती.

    Success Story : लॉकडाऊनमध्ये पतीची गेली नोकरी, पण तिने मानली नाही हार, उभारला लाखोंचा व्यवसाय

    ग्रॅज्युएशननंतर त्याने सरकारच्या शारीरिक अपंग श्रेणीतून सरकारी नोकरीसाठी अर्ज केला पण तो अपात्र ठरला. मात्र तो थांबला नाही आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम सुरू केलं. कालांतराने त्याने ती नोकरीही सोडली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    कोणत्याही गोष्टीसाठी इतरांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी त्याने त्याच्या शौच क्रियांवरही नियंत्रण मिळवलं. आता तो 5-6 तास या क्रिया कंट्रोल करू शकतो. नंतर रोशनला इलेक्ट्रॉनिक हातांची गरज वाटली, त्याची किंमत 13 लाख रुपये होती. त्याने चॅरिटेबल ट्रस्ट व संस्थांकडून मदत मागितली, पण हवी तितकी रक्कम जमा झाली नाही. शेवटी राजस्थानातील एका एनजीओने त्याची मदत केली.

    Jalna News : शेतकऱ्याच्या लेकीची हॅटट्रिक, 3 मुलींची पोलीस भरतीत निवड, गावातच एकच जल्लोष

    इलेक्ट्रॉनिक हात मिळाल्यानंतर रोशनने स्वतःची संस्था सुरू केली व मुलांना तो विविध सॉफ्टवेअर प्रोग्रॅम शिकवू लागला. नंतर त्याला बडोदा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँकेत सहायक मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. या शिवाय तो यशस्वी लेखक व वक्ताही बनला. आतापर्यंत त्याला राजस्थान सरकार व अनेक संस्थांकडून सन्मानित करण्यात आलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात