मुंबई, 15 सप्टेंबर: असं म्हणतात तुमचं वय आणि परिस्थिती काहीही असू देत जर तुमच्यात जिद्द असली तर सर्वकाही यशात बदलण्याची सखमता तुमच्यात असते. कधीकधी कुठली व्यक्ती वाईट परिस्थितीलाही आपल्या जिद्दीसमोर झुकण्यास भाग पाडते. त्यात जर ती व्यक्ती आई असेल तर तिच्यातील जिद्द दुपटीनं वाढते. अशीच एक आई आहे जिनं तीन मुलांचा सांभाळ करून दहावीची परीक्षा दिली. नुसती दिलीच नाही तर तब्बल 93.4% घेऊन ती क्रॅक करून दाखवली आहे. एखादी गोष्ट करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर माणूस सर्व संकटानंतरही आपले ध्येय साध्य करू शकतो. असेच काहीसे काश्मीरमधील एका महिलेने केले आहे. तिनं लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी अभ्यास सुरू केला आणि दहावीत 93.4% गुण मिळवले आहेत. Bank Of India Recruitment: प्राध्यापकांपासून वॉचमनपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका; इथे लगेच पाठवा अर्ज या आईचा नाव आहे सबरीना खालिक. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील ही महिला 3 मुलांची आई आहे. घरात अनेक जबाबदाऱ्या आहेत, पण त्यानंतरही सबरीना खालिकचे अभ्यासाशी असलेले नाते तुटले नाही. घरची परस्थिती बिकट असूनही तिनं जिद्दीनं दहावी पास करून दाखवली. घरगुती काम करूनही तिने अभ्यास सुरू ठेवला आणि दहावीला प्रवेशही घेतला. प्रवेश घेतल्यानंतर अशी वेळही आली जेव्हा तिनी फक्त दहावीची परीक्षा दिलीच नाही, तर त्यात यशही मिळवलं. निकाल लागला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. या महिलेला 10वी बोर्डाच्या परीक्षेत 93.4% गुण मिळाले होते. जे बघून सर्वांनाच धक्का बसला होता.
10 वर्षांनी अभ्यास सुरू केला सबरीना खालिकचे 2012 मध्ये लग्न झाले आणि त्यानंतर तिने आपले शिक्षण सोडले. 10 वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. आता तिने केवळ 10वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर 500 पैकी 467 गुण मिळवून तिच्यासारख्या अनेक महिलांना शिकण्याची आणि जिद्दीनं काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा प्रदान केली आहे.