जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / सासरच्या छळाला कंटाळून सोडलं घर अन् झाल्या सरकारी अधिकारी; जाणून घ्या सविता प्रधान यांची संघर्षगाथा

सासरच्या छळाला कंटाळून सोडलं घर अन् झाल्या सरकारी अधिकारी; जाणून घ्या सविता प्रधान यांची संघर्षगाथा

सासरच्या छळाला कंटाळून सोडलं घर अन् झाल्या सरकारी अधिकारी; जाणून घ्या सविता प्रधान यांची संघर्षगाथा

आजही काही ठिकाणी स्त्रियांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मध्य प्रदेश सरकारमध्ये जॉइंट सेक्रेटरी पदावर नियुक्त असलेल्या सविता प्रधान या संघर्षाचं जिवंत उदाहरण आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 मे:  आजकाल स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. कारण, जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. मात्र, आजही काही ठिकाणी स्त्रियांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मध्य प्रदेश सरकारमध्ये जॉइंट सेक्रेटरी पदावर नियुक्त असलेल्या सविता प्रधान या संघर्षाचं जिवंत उदाहरण आहेत. सविता प्रधान यांची संघर्षगाथा ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील. सविता यांनी अतिशय कमी वयात लग्न, कौंटुबिक हिंसाचार, सामाजिक परंपरांचं बंधन अशा सर्व गोष्टी सहन केल्या आहेत. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या यशाची आणि संघर्षाची कहाणी शेअर केली आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. किशोरवयातच झालं लग्न गावामध्ये राहणाऱ्या सविता प्रधान दहावी उत्तीर्ण झालेल्या पहिली मुलगी होत्या. दहावी पास झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या घरात लग्नाची चर्चा सुरू झाली. सविता यांनी एका मुलाखतीत सांगितलं, “वयाच्या 16-17 व्या वर्षी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलाशी माझं लग्न झालं होतं. तो मला भेटायला आला तेव्हाच त्यानं माझ्याशी गैरवर्तन केलं होतं. मी लग्नाला नकार दिला होता पण, घरातील लोकांच्या दबावामुळे मी लग्नासाठी तयार झाले.”

News18लोकमत
News18लोकमत

सासरी गेल्यानंतर सुरू झाला छळ सासरी झालेल्या छळाबद्दल बोलताना सविता म्हणाल्या, “लग्नानंतर मी माझ्या सासरच्या घरी गेले. तिथे गेल्यावर माझ्यासाठी अनेक नियम आणि बंधनं लावलेली होती. मला संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक करावा लागे. यासोबतच नेहमी घुंगट घेऊन फिरावं लागे. माझा नवरा प्रत्येक लहानसहान गोष्टींसाठी मला मारहाण करत असे. या दरम्यान मी आजारी पडले. डॉक्टरकडे गेल्यानंतर मला समजलं की मी गरोदर आहे. काही दिवसांनी मला मुलगा झाला. मी माझ्या सासरच्या घरी जायला तयार नव्हते. सर्व काही ठीक होईल असं आश्वासन देऊन माझ्या माहेरच्या लोकांनी पुन्हा मला सासरी पाठवलं. काही महिन्यांनी मला दुसरं मुलं झालं. त्याच्या जन्मानंतरही सासरच्यांच्या वागण्यात फरक पडला नाही.” बाथरूममध्ये चोरून जेवायचे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध अधिकारी सविता प्रधान म्हणाल्या की, सासरच्या घरात त्यांच्यावर इतकी बंधनं होती की त्यांना नीट जेवणही मिळत नसे. घरातील सर्वांचं जेवण झाल्यानंतर त्यांना शेवटी जेवण मिळायचं. जेवण शिल्लक राहिलं नाही तर घरातील सुनांना उपाशीच रहावं लागत असे. त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर सविता आपल्या अंडरगारमेंटमध्ये चपाती लपवायच्या आणि बाथरूममध्ये जाऊन खायच्या. NEET UG परीक्षेत पुन्हा लाजिरवाणा प्रकार; चेकिंगच्या नावावर महिला उमेदवारांना काढायला सांगितले अंडरगारमेंट्स आत्महत्या करण्याचा केला होता विचार एक वेळ अशी आली होती की, सविता यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. याबाबत त्या म्हणाल्या, “मी मुलांना कुरवाळलं आणि नंतर दरवाजा बंद केला. साडीचा फास तयार केला. मी फास गळ्यात अडकवणार होते तेव्हा माझं लक्ष खिडकीकडे गेलं. खिडकी उघडी होती आणि तिथे माझ्या सासूबाई उभ्या होत्या. मी जीव देत असल्याचं बघूनही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर मी माझा विचार बदलला आणि त्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. Google India Jobs: Google इंडियामध्ये ‘या’ जागांसाठी बंपर ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? लगेच बघा डिटेल्स नातेवाईक आणि आईनं केली मदत सविता प्रधान यांनी सासरचं घर सोडलं आणि एका नातेवाईकाकडे राहू लागल्या. मुलांचं संगोपन करण्यासाठी त्यांनी ब्युटी पार्लरमध्ये काम केलं. सविता म्हणाल्या की, सासरचं घर सोडण्यापूर्वी मी ठरवलं होतं की, मी मोलकरणीचं काम करेन, गरज पडली तर वेश्याही होईन पण सासरी येणार नाही. यानंतर सविता यांच्या आईनं त्यांना पाठिंबा दिला. एका छोट्या सविता आपली आई आणि दोन मुलांसह राहू लागल्या. रोजगाराच्या बातम्यांमध्ये त्यांनी पीएससीची जाहिरात बघितली. त्याचा फॉर्म भरून त्यांनी अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात पीटी क्लिअर झाला. यामुळे त्यांना आनंद तर झालाच शिवाय प्रोत्साहनही मिळालं. यानंतर त्यांनी मेन्स परीक्षा आणि इंटरव्ह्यू क्लिअर केला. ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट; ‘या’ महापालिकेत थेट 45,000 रुपये पगाराची नोकरी; अवघ्या 2 दिवसांत मुलाखत एका दिवसात घेतला घटस्फोट अधिकारी झाल्यानंतरदेखील सविता यांचा पती त्यांच्या घरी येऊन मारहाण करत असे. एके दिवशी जिल्ह्याच्या एसपींना त्यांनी आपली गोष्ट सांगितली. एसपींनी सविता यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. एक दिवस सरकारी बंगल्यावर येऊन पतीनं मारहाण करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली. या घटनेनंतर दोघांचेही मार्ग वेगळे झाले. सविता प्रधान म्हणाल्या की, मी पहिली महिला आहे जिला एका दिवसाच्या सुनावणीत घटस्फोट मिळाला आहे. IRCTC Recruitment: भारतीय रेल्वेत जनरल मॅनेजर पदासाठी भरती, जाणून घ्या पगार, पात्रतेच्या अटी लवकरच होणार आएएस पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर सविता प्रधान यांनी 2015 मध्ये दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर त्यांना एक मूलही झालं आहे. सध्या त्या आपल्या मुलांसोबत आणि पतीसोबत आनंदी जीवन जगत आहे. यासोबतच संघर्ष करणाऱ्या महिलांच्या गोष्टी सर्वांसमोर आणण्यासाठी सविता प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सविता प्रधान यांनी एका महिला कुलीची गोष्ट शेअर केली आहे. जी महिल्या आपल्या पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. अनेक अडचणींचा सामना करून अधिकारी झालेल्या सविता प्रधान लवकरच आयएएस होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात