जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / NEET UG परीक्षेत पुन्हा लाजिरवाणा प्रकार; चेकिंगच्या नावावर महिला उमेदवारांना काढायला सांगितले अंडरगारमेंट्स

NEET UG परीक्षेत पुन्हा लाजिरवाणा प्रकार; चेकिंगच्या नावावर महिला उमेदवारांना काढायला सांगितले अंडरगारमेंट्स

NEET UG परीक्षेत पुन्हा लाजिरवाणा प्रकार; चेकिंगच्या नावावर महिला उमेदवारांना काढायला सांगितले अंडरगारमेंट्स

NEET UG परीक्षा केंद्रातून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. इथे महिला उमेदवारांना तपासणीदरम्यान अंडरगारमेंट्स काढण्यास सांगण्यात आलं अशी माहिती मिळाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 मे: रविवारी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर NEET UG परीक्षा घेण्यात आली. मात्र अनेकदा अशा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन किंवा विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याच्या घटना समोर येत असतात. तसंच यावेळीही घडलंय. चेन्नईच्या परीक्षा केंद्रातून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. इथे महिला उमेदवारांना तपासणीदरम्यान अंडरगारमेंट्स काढण्यास सांगण्यात आलं अशी माहिती मिळाली आहे. NEET- UG 2023 दरम्यान, काही उमेदवारांनी आरोप केला की त्यांना त्यांचा पोशाख काढण्यास सांगण्यात आलं किंवा त्यांना आतमध्ये घालण्यास सांगितलं होतं. तसंच काही अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या पालकांकडून कपडे बदलण्यास सांगितलं. इतकंच नाही तर काही महिला उमेदवारांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार सेंटरवर काही माळीणच्या ब्रा स्ट्रिप्स तपासण्यात आल्या तर काहींना ब्रा काढून ठेवण्यास सांगण्यात आलं.

News18लोकमत
News18लोकमत

इतकंच नाही तर महिला उमेदवारांना त्यांचे जीन्स त्यांच्या आईच्या लेगिंग्ससह एक्सचेंज करण्यासही सांगण्यात आलं. परीक्षा महत्त्वाची असल्यामुळे अनेक उमेदवारांनी विरोध दर्शवूनही हे काम त्यांना करावं लागलं असं काही उमेदवारांनी सांगितलं आहे. तसंच सेंटरच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकराची कपडे बदलण्याची खोली किंवा बंधिस्त रूम नसल्यामुळे महिला उमेदवारांना मोकळ्या जागेतच कपडे बदलावे लागले. तसंच आपल्या मुलींचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांना कपड्यांच्या साहाय्यानं त्यांना कव्हर करावं लागलं असं काही उमेदवार आणि त्यांच्या पालकांचं म्हणणं आहे. काही विद्यार्थी केवळ आतील कपडे घालून परीक्षा हॉलमध्ये गेले, असा आरोपही विद्यार्थ्याने केला आहे. Google India Jobs: Google इंडियामध्ये ‘या’ जागांसाठी बंपर ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? लगेच बघा डिटेल्स एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, परीक्षा केंद्रावर काही मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या काढून घेण्यात आल्या. तसंच काहींना जवळच्या एंक वस्तू काढून घेऊन मगच आतमध्ये प्रवेश देण्यात आला. “इतक्या रात्री कोण ट्युशनला जातं?” लोकांनी हिणवलं पण तिनं मानली नाही हार; क्रॅक केली ही परीक्षा काही विद्यार्थी ड्रेस कोडचे पालन करत नाहीत आणि म्हणून त्यांना त्यांचा पोशाख बदलण्यास सांगितले. मात्र या सर्व प्रकरणाची आता NTA नं दखल घेतली आहे. NTA ने सांगितले की, परीक्षा केंद्रावरील कर्मचार्‍यांना महिला उमेदवारांच्या छेडछाडीत गुंतलेल्या संवेदनशीलतेची जाणीव ठेवण्यासाठी ते सर्वसमावेशक सूचना जारी करतील अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थिनींसोबत झालेल्या हा प्रकार अतिशय लाजिरवाणा असल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात