जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Success Story: कधीकाळी कमवत होता अवघे 10 रुपये, आज आहे तब्बल 730 कोटींच्या कंपनीचा मालक

Success Story: कधीकाळी कमवत होता अवघे 10 रुपये, आज आहे तब्बल 730 कोटींच्या कंपनीचा मालक

Success Story: कधीकाळी कमवत होता अवघे 10 रुपये, आज आहे तब्बल 730 कोटींच्या कंपनीचा मालक

मुस्तफाच्या या यशाबद्दल त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर: असं म्हणतात या जगात अशक्य असं काहीच नाही. जिद्द असेल तर अशक्यही शक्य होऊ शकतं. अशीच एक व्यक्ती आहे ज्यानं स्वप्न बघितलं आणि ते आपल्या जिद्दीनं पूर्ण करून दाखवलं. कधीकाळी अवघे दहा रुपये कमावणाऱ्या व्यक्तीनं आज 730 कोटींची कंपनी उभी केली (Success Story). त्या व्यक्तीचं नाव आहे मुस्तफा पीसी (Mustafa PC). मुस्तफाच्या या यशाबद्दल त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं आहे. याबद्दल वृत्त ‘आजतक ’नं प्रकाशित केलं आहे. मुस्तफा पीसीचा जन्म केरळमधील (Karala) एका दुर्गम गावात झाला. त्याचे वडील रोजंदारीवर मजूर होते, मुस्तफा स्वतः कामावर जात असत. मात्र आपल्या मुलानं चांगलं शिकावं असं वडिलांना वाटत होतं. मात्र मुस्तफा लहान असताना एका वर्गात नापास झाले आणि त्यांनाही शाळेत जाणं बंद केलं. मुस्तफा एका मुलाखतीत म्हणतात, आम्हाला फक्त 10 रुपये रोजंदारी मिळत होती. त्यावेळी दिवसातून तीन वेळचं जेवण करणं हे आमचा स्वप्न होतं. त्यामुळे मी स्वतःला सांगितलं होतं की आता शिक्षणापेक्षा पोट भरणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिक्षण सोडलं. मात्र एका शिक्षकांनी मला पुन्हा शिक्षण सुरु करण्याचा सल्ला दिला आणि मला मोफत शिक्षणही दिलं. ज्यावेळी कॉलेजमध्ये जाण्याची वेळ अली त्यावेळी त्यांनीच माझं शुल्क भरलं त्यामुळे मी शिकू शकलो. हे वाचा - Interview Tips: Why Should We Hire You? असं द्या प्रश्नाचं Perfect उत्तर जेव्हा मला पहिल्यांदा नोकरी मिळाली तेव्हा मला तब्बल चौदा हजार रुपये पगार होता. मी माझ्या वडिलांना पगार आणून दिला तेव्हा माझे वडील रडू लागले. कारण ते पैसे त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कमाईपेक्षा अधिक होते असंही मुस्तफा म्हणाले. एकदा मुस्तफा यांनी आपल्या भावाला मळक्या पाकिटातून इडलीचं पीठ विकताना बघितलं. त्यावेळी त्यांना एक फूड कंपनी उघडण्याची आयडिया आली. त्यांनी आपल्या कंपनीला आयडी फूड्स नाव देण्याचं ठरवलं. आज मुस्तफा हे 730 कोटींच्या कंपनीचे मालक आहेत. मात्र इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला आहे त्या संघर्षास सलाम.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात