Home /News /career /

Interview Tips: Why Should We Hire You? नोकरीसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न; असं द्या Perfect उत्तर

Interview Tips: Why Should We Hire You? नोकरीसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न; असं द्या Perfect उत्तर

आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं Perfect उत्तर (Useful Job Interview Tips) कसं देणार याबद्दल सांगणार आहोत.

    मुंबई, 01 सप्टेंबर: जॉबसाठी मुलाखतीला (Job Interview Tips) जाताना आपण पूर्णपणे तयारी करून जातो. ज्या कंपनीमध्ये आपण मुलाखत देणार आहोत त्या कंपनीबाबत संपूर्ण माहिती घेतो, आपल्या शिक्षणाशी संबंधित प्रश्नांना  (Education questions in Interview) कसं उत्तर देणार याचीही माहिती घेतो. मात्र मुलाखतीत असे काही प्रश्न असतात ज्यांची उत्तर आपण आधीपासून तयार (Top Interview Questions and Answers) करून ठेऊ शकत नाही. अनेकदा मुलाखत ही आपल्या शिक्षणाच्या जोरावर नाही तर मानसिक क्षमतेच्या जोरावर होते. म्हणूनच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सकारात्मक पद्धतीनं देणं आवश्यक आहे. असाच एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तो म्हणजे Why Should We Hire You? म्हणजेच आम्ही तुम्हालाच नोकरी का द्यावी? (Why Should We Hire You? Answer). हा प्रश्न बहुतांश मुलाखतींमध्ये विचारण्यात येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं Perfect उत्तर (Useful Job Interview Tips) कसं देणार याबद्दल सांगणार आहोत. साधारणतः हा प्रश्न मुलाखतीच्या शेवटी विचारला जातो. जर तुमचं शिक्षण, तुमची एकूणच पर्सनॅलिटी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला आवडली तर हा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्यातील सकारात्मकता तपासणे हे असतं. तसंच तुम्हाला हा जॉब किती महत्त्वाचा आहे हेही या प्रश्नाच्या उत्तरातून समजतं.मात्र अनेकदा आपण हा प्रश्न विचारला की घाबरून जातो किंवा चुकीचं उत्तर देतो. हे वाचा - Personality Development Tips: इतरांशी महत्त्वाचं बोलताना कधीही करू नका 'या' चुका उत्तरात हे कधीही सांगू नका मी मेहनती आहे, परिश्रम करू शकतो, माझ्याहून चांगलं काम इथे कोणीच करू शकणार नाही, माझ्यात सर्व प्रकारचं काम करण्याची क्षमता आहे असे उत्तरं कधीही देऊ नका. ही उत्तरं बोलायला सोपी असली तर हे प्रत्यक्षात करणं कठीण आहे. त्यामुळे अतिआत्मविश्वास कधीच दाखवू नका. तुमच्यातील वाईट सवयीही सांगू नका. हे असू शकतं Perfect उत्तर कोणतंही काम करताना मी त्यात काहीतरी शिकायला मिळेल या उद्देशानं करतो त्यामुळे माझं लक्ष दुरीकडे कुठे विचलित होत नाही. काम करताना प्लॅनिंगनुसार करायची मला सवय आहे त्यामुळे काम करण्यास मला अडचणी येत नाही. मला कोणाशीही जुळवून घेण्यास कधीच अडचण येत नाही त्यामुळे मी काम वेगात पूर्ण करू शकतो. एकूणच काय तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही तुमच्यातील काही सुप्त गुण सांगू शकता. तसंच कंपनीच्या फायद्याबद्दल बोलून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता.
    First published:

    Tags: Jobs

    पुढील बातम्या