जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Success Story: 14 वर्षांच्या वयात जिंकलं KBC; 2 वेळा UPSC पास करत झाले IPS अधिकारी; कौतुक करावं तेवढं कमी

Success Story: 14 वर्षांच्या वयात जिंकलं KBC; 2 वेळा UPSC पास करत झाले IPS अधिकारी; कौतुक करावं तेवढं कमी

आयपीएस रविमोहन सैनी

आयपीएस रविमोहन सैनी

आज आम्ही तुम्हाला ज्या IPS ऑफिसर्सबद्दल सांगणार आहोत. त्यांनी लहानपणी चक्क अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती मध्ये जाऊन कोटी रुपये जिंकले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 जुलै: काही विद्यार्थी किती हुशार आणि चाणक्य असतात हे त्यांच्या लहानपणापासूनच दिसायला सुरुवात होते असा म्हणतात. अनेक मोठे शास्त्रज्ञ आणि अधिकारी हे लहान पणापासूनच हुशार असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या IPS ऑफिसर्सबद्दल सांगणार आहोत. त्यांनी लहानपणी चक्क अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती मध्ये जाऊन कोटी रुपये जिंकले आहेत. तसंच IPS होऊनही दाखवलं आहे. नक्की कोण आहेत हे जाणून घेऊया. आयपीएस रविमोहन सैनी यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. ‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्ही शो पाहणारा प्रत्येक प्रेक्षक त्यांना ओळखतो. 2001 मध्ये त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ ज्युनियरमध्ये सामील होऊन 1 कोटी रुपये जिंकले. मग साऱ्या देशाने त्यांच्या हुशारीचं कौतुक केलं. खुद्द सुपरस्टार अमिताभ बच्चन देखील त्यांचे प्रशंसक बनले होते. India Security Press Recruitment: 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; इथे होतेय तब्बल 108 जागांसाठी बंपर भरती 10वी मध्ये उज्ज्वल नशीब रविमोहन सैनी त्यावेळी दहावीत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेव्हा त्यांचं वय फक्त 14 वर्षे होतं. त्यांना मेगास्टार अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी व्हायचं होतं. हॉट सीटवर बसून अमिताभ बच्चन यांच्या पंधरा कठीण प्रश्नांची उत्तरे देत ते कौन बनेगा करोडपती ज्युनियर (कौन बनेगा करोडपती प्रश्न) झाले. AIIMS Recruitment: 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी AIIMS मध्ये बंपर ओपनिंग्स; पात्र असाल तर ही घ्या डायरेक्ट लिंक वडिलांकडून मिळाली प्रेरणा रविमोहन सैनी यांना त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली होती. त्यांचे वडील नौदल अधिकारी होते. रवीने जयपूरच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. पण त्यांना फक्त डॉक्टर व्हायचे नव्हते. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे त्यांचे ध्येय होते. UPSC परीक्षेच्या (UPSC Exam) तयारीसाठी त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही.

News18लोकमत
News18लोकमत

इंटर्नशिपसह झाले IPS रवि मोहन सैनी 2012 मध्ये UPSC मुख्य परीक्षा पास करू शकला नाही. त्यामुळे 2013 मध्ये त्यांची भारतीय टपाल विभागाच्या (सरकारी नोकरी) लेखा आणि वित्त सेवा विभागात सरकारी नोकरीसाठी निवड झाली. त्यानंतर 2014 साली मेडिकल इंटर्नशिप दरम्यान त्यांनी पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. यावेळी तेऑल इंडिया रँक ४६१ ने उत्तीर्ण झाले. रवी हे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात