जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / विद्यार्थ्यांनो, चांगले गुण मिळवण्यासाठी ट्युशन लावण्याची गरजच नाही; अशी करा Self Study; वाचा टिप्स

विद्यार्थ्यांनो, चांगले गुण मिळवण्यासाठी ट्युशन लावण्याची गरजच नाही; अशी करा Self Study; वाचा टिप्स

5. स्टडी रूममध्ये अभ्यास करताना हे ध्यानात ठेवावे की, तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.

5. स्टडी रूममध्ये अभ्यास करताना हे ध्यानात ठेवावे की, तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.

आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स (Study Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी सेल्फ स्टडी (How to do self study) करू शकता आणि चांगले मार्क्स मिळवू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई , 07 फेब्रुवारी: आजकालच्या काळात परीक्षेत चांगले मार्क्स (How to get good marks) मिळवायचे असतील तर शाळेसोबतच अनेक विद्यार्थी ट्युशन किंवा कोचिंग क्लासेस लावतात. यामध्ये विद्यार्थ्यांची एक्सट्रा तयारी करून घेतली जाते. यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे मार्क्सही वाढतात. मात्र देशातील प्रत्येक विद्यार्थी ट्युशन (how to study without coaching classes) लावू शकत नाहीत. परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहतात. मात्र काही विद्यार्थ्यांना या परिस्थतीतपासून काहीही फरक पडत नाही. जरी ट्युशनमध्ये देण्यासाठी पैसे नसतील तरी काही विद्यार्थी यामधूनही मार्ग काढतात आणि चांगला अभ्यास (How to study well) करतात. असे विद्यार्थी अनेकदा परीक्षेत टॉपही (top in exam) करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स (Study Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी सेल्फ स्टडी (How to do self study) करू शकता आणि चांगले मार्क्स मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. सेल्फ स्टडी करा   कोणत्याही परीक्षेची तयारी करताना स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोनाच्या काळात प्रत्येकाला घरात राहून स्वत:ची तयारी करायला शिकवली आहे. जर तुम्ही कोचिंगची भरमसाठ फी भरू शकत नसाल तर स्वअभ्यासातून तुमची तयारी सुधारा. यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील आणि तुमची प्रगती होईल. Interview Tips: मुलाखतीला जाताना कधीच वाटणार नाही भीती; फक्त या टिप्स करा फॉलो अभ्यासाचं साहित्य असणं आवश्यक जोपर्यंत तुमच्याकडे अभ्यासाचं साहित्य असणार नाही तुमचा अभ्यास चांगला होणार नाही. म्हणूनच स्वत:च्या अभ्यासादरम्यान, तुमच्यासाठी योग्य अभ्यास साहित्य असणे महत्त्वाचे आहे. यासाठी वरिष्ठांशी बोलून त्यांचे मत जाणून घेऊ शकता. बुक स्टोअर्स, एनसीईआरटी, लायब्ररी, ई-कॉमर्स साइट्स किंवा किंवा जुन्या पुस्तकांच्या मदतीनं अभ्यास करा. टाइम टेबलनुसार अभ्यास करा परीक्षेची तयारी करण्यासाठी निश्चित वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार अभ्यास करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी लहान ध्येये ठेवा. मॉक टेस्ट द्या, नोट्स बनवा आणि चालू घडामोडी वाचा. अभ्यासादरम्यान विश्रांती घ्या आणि व्यायाम करा. पालकांनो, मुलांनी परीक्षेत यश मिळवावं अशी इच्छा आहे? मग या खास टिप्स वाचा अभ्यास करताना आत्मविश्वास ठेवा अनेकदा तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकाल की नाही हे तुमच्यातील आत्मविश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे अभ्यास करताना किंवा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास ढासळू देऊ नका. तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात