जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Interview Tips: मुलाखतीला जाताना आता कधी वाटणार नाही भीती; फक्त या टिप्स करा फॉलो

Interview Tips: मुलाखतीला जाताना आता कधी वाटणार नाही भीती; फक्त या टिप्स करा फॉलो

जॉब मुलाखत

जॉब मुलाखत

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Interview tips in Marathi) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही घाबरणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 फेब्रुवारी : 2 वर्षे करिअरशी संघर्ष केल्यानंतर पुन्हा एकदा रोजगाराच्या संधी येऊ लागल्या आहेत. जे त्यांचे करिअर (Career Tips) सुरू करण्यासाठी नवीन नोकरी शोधत आहेत किंवा अनेक वर्षांच्या अनुभवानंतर करिअर वाढीसाठी (Career Growth tips) नोकरी बदलू इच्छितात, त्यांच्यासाठी अनेक पर्याय खुले आहेत. मात्र बरीच वर्ष निघून गेल्यामुळे आणि गेली दोन वर्ष घरून काम असल्यामुळे अनेकांना आता आत्मविश्वास (How to build confidence in job Interview) राहिला नाही. त्यामुळे जॉबच्या मुलाखतीची अनेकांना भीती वाटत आहे. पण घाबरू नका. मुलाखतीपूर्वी नर्व्हस वाटण्यात काहीच गैर नाही पण त्याचा तुमच्या मुलाखतीवर परिणाम होऊ देऊ नका. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Interview tips in Marathi) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही घाबरणार नाही. काही लोक मुलाखतीदरम्यान इतके घाबरतात की त्यांचा चेहरा पाहूनच मुलाखत घेणाऱ्याला याची कल्पना येते. अशा परिस्थितीत तुमची नाकारण्याची शक्यताही वाढते. तुम्‍हाला तुमच्‍या मुलाखतीतून समोरच्‍या व्‍यक्‍तीला प्रभावित करायचं असेल तर तुम्ही या टिप्सची मदत घेऊ शकता. यामुळे तुमची नोकरी मिळण्याची हमी देखील वाढेल. चला तर जाणून घेउया टिप्स. महत्त्वाची बातमी! जॉब जॉईन करताना कंपनीबद्दल ‘ही’ माहिती घेणं अत्यंत आवश्यक मुलाखतीसाठी काही टिप्स केवळ पात्र असण्याने तुमच्या निवडीची हमी मिळत नाही. मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचे असते. म्हणूनच तुमची बॉडी लेन्गवेज आणि तुमचे वागणे, बोलणे नीट असू द्या. मुलाखत देण्यापूर्वी काही मॉक इंटरव्ह्यूचा सराव करा. तसेच ते रेकॉर्ड केल्याचे सुनिश्चित करा. हे तुम्हाला तुमच्या चुकांची चांगली कल्पना देतील. मुलाखती दरम्यान, जर तुम्हाला विचारले गेले की पुढील 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे पाहता, तर समजून घ्या की मुलाखत पॅनेल तुमचा आत्मविश्वास तपासत आहे. मुलाखतीदरम्यान परिधान केलेल्या कपड्यांचाही तुमच्या करिअरच्या वाढीवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे तुमच्या क्षेत्राशी संबंधित स्वच्छ आणि प्रेस केलेले कपडे घाला. इंटरव्ह्यू हॉलमध्ये जाण्यापूर्वी पाणी पिण्यास विसरू नका. दीर्घ श्वास घेऊन तुमची अस्वस्थता कमी करा आणि तुमची सर्वोत्तम कामगिरी देण्याचा प्रयत्न करा. Career Tips: तुमच्यातही आहेत का एका IAS ऑफिसरचे गुण? असं घ्या जाणून या चुका करणे टाळा उत्तर देताना जास्त बोलणे योग्य मानले जात नाही. तुम्हाला माहित असले पाहिजे की मुलाखत घेणाऱ्याकडे इतर अनेकजण आहेत त्यामुळे कमी बोला. उत्तर देताना तोतरे बोलल्याने उमेदवारामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे समजते. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना आई-वडील किंवा कुटुंब इत्यादींबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. मुलाखतकाराला यात फारसा रस नसतो. आपले नाव सांगितल्यानंतर, आपल्या छंदांबद्दल सांगू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात