मुंबई, 09 नोव्हेंबर: परदेशात शिक्षण घेण्याचे बहुतेक तरुणांचे स्वप्न असते. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील वायपापा तोमाता राऊ विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना हे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी देत आहे. हे विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी 1.5 दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्स म्हणजेच 7 कोटी 30 लाख 69 हजार 431 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देत आहे. या शिष्यवृत्तीसाठी, उमेदवाराला अधिकृत वेबसाइट auckland.ac.nz वर अर्ज करावा लागेल. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतरच तुम्ही पुढील शिक्षण घेऊ शकता. कधीपर्यंत अर्ज करता येईल या शिष्यवृत्तीचे नाव हाय अचिव्हर्स स्कॉलरशिप असे आहे. अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. विद्यार्थी 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. यानंतर, तुम्ही 9 मार्च 2023 ते 20 एप्रिल 2023 पर्यंत पुन्हा अर्ज करू शकाल. ट्विटर, इन्स्टानंतर आता मेटाचा दणका! तब्बल 11,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना एका क्षणात काढलं शिष्यवृत्ती कशी आणि किती मिळेल ऑकलंड विद्यापीठाने दिलेली ही शिष्यवृत्ती अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे. ऑकलंड विद्यापीठाने देऊ केलेली ही शिष्यवृत्ती 2 वर्षांतून एकदा दिली जाईल. तसेच 115 शिष्यवृत्ती आहेत, ज्या वर्षातून दोनदा दिल्या जातील. ही शिष्यवृत्ती कशी मिळवायची दरवर्षी 20 हजार डॉलर्सपर्यंतच्या 5 शिष्यवृत्ती उपलब्ध असतील. त्याचबरोबर 10 हजार डॉलर्स आणि 5 हजार डॉलर्सपर्यंतच्या 100 शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. Career टिप्स: नक्की किती असते सेलिब्रिटीजच्या बॉडीगार्ड्सची सॅलरी? असे असतात पात्रतेचे निकष या शिष्यवृत्तीचा उद्देश काय हाय अचिव्हर्सने देऊ केलेल्या या शिष्यवृत्ती खास भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 200 हून अधिक शिष्यवृत्तीची तरतूद ठेवण्यात आली आहे. या विशेष शिष्यवृत्तीचा उद्देश भारतातील हुशार विद्यार्थ्यांची निवड करणे आणि त्यांना ऑकलंड विद्यापीठात एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी पूर्णवेळ अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.