मराठी बातम्या /बातम्या /करिअर /NEET UG Result: मेळघाट आणि गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; पास केली NEET परीक्षा

NEET UG Result: मेळघाट आणि गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; पास केली NEET परीक्षा

महाराष्ट्र तर्फे 30 डिसेंबरपासून राज्य कोट्यातील जागांसाठी काउन्सिलिंग

महाराष्ट्र तर्फे 30 डिसेंबरपासून राज्य कोट्यातील जागांसाठी काउन्सिलिंग

संपूर्ण देशभरातून त्यांचं कौतुक (Success story of NEET students) होत आहे.

मुंबई, 05 नोव्हेंबर: जिद्द आणि कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सुरु ठेवण्याची इच्छा मनात असेल तर काहीही अशक्य नाही असं म्हणतात. मात्र हे प्रत्येकालाच जमेलच असं नाही. शहरात राहून सर्व सोयी सुविधा, इंटरनेट, उत्तम शिक्षक-मार्गदर्शक मिळूनसुद्धा अनेक विद्यार्थी जे काम करू शकत नाहीत ते काम मेळघाट (Melghat) आणि गडचिरोलीतील (Gadchiroli) आदिवासी विद्यार्थ्यांनी (Success of tribal Student) करून दाखवलं आहे. अति दुर्गम भागात जिथे सोयी सुविधाही नाहीत अशा ठिकाणी अभ्यास करून मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा (NEET Exam Toppers) उत्तीर्ण केली आहे. यासाठी संपूर्ण देशभरातून त्यांचं कौतुक (Success story of NEET students) होत आहे.

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील नागरगुंडा गावात राहणारा सूरज पुनागती (19) NEET परीक्षेत 720 पैकी 378 गुण मिळवून खूप आनंदी आहे, जे त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. पीटीआय-भाषाशी केलेल्या संभाषणात पुनागती यांनी दावा केला की, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणारा तो त्यांच्या तालुक्यातील पहिला विद्यार्थी आहे.

Business: हा व्यवसाय सुरू करणं आहे फायदेशीर, गाव ते शहर सर्वत्र आहे मोठी मागणी

सूरज हा शेतकऱ्याचा मुलगा. त्यांनी सांगितलं की गावात 60 कुटुंबं आहेत आणि विज्ञान शाखेत शिकणारा तो पहिला विद्यार्थी होता आणि आता मेडिकल शाखेत प्रवेश घेण्यासाठी तो उत्सुक आणि आनंदी आहे. राज्याच्या असुरक्षित आदिवासी गटातील 'मारिया गोंड' या पुनागतीच्या आईचं चार वर्षांपूर्वी निधन झालं आणि त्याचा धाकटा भाऊ दहावीचा विद्यार्थी आहे. पुनागती नागपुरातील एका शाळेत शिकतो. त्याला 10वीत 92 टक्के गुण मिळाले आणि त्यानंतरच त्यानं डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला असं तो सांगतो.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील डहणी तालुक्यातील घोटा या छोट्याशा गावातील अत्यंत गरीब शेतकऱ्याचा मुलगा सावन शिलास्कर (21) यानं NEET परीक्षेत 720 पैकी 294 गुण मिळवले आहेत.दोन्ही विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मर्यादित साधनांमुळे हा प्रवास खडतर होता, परंतु पुण्यातील एमबीबीएस विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या एनजीओ 'लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट' (LFU) द्वारे त्यांना मोफत कोचिंग क्लासेस दिल्याने त्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Success story