Home /News /career /

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे तब्बल 69 पदांसाठी जागा रिक्त; या पद्धतीनं करा अर्ज

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे तब्बल 69 पदांसाठी जागा रिक्त; या पद्धतीनं करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    मुंबई, 26 ऑगस्ट:   स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई (State Bank Of India Mumbai recruitment 2021) इथे तब्बल 69 जागांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपव्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सर्कल संरक्षण बँकिंग सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती उपव्यवस्थापक (Deputy Manager) संबंध व्यवस्थापक (Relationship Manager) उत्पादन व्यवस्थापक (Product Manager) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) सर्कल संरक्षण बँकिंग सल्लागार (Circle Defence Banking Advisor) हे वाचा - GATE 2022 Dates: 'या तारखेपासून सुरू होणार GATE 2022 साठी रजिस्ट्रेशन शैक्षणिक पात्रता उपव्यवस्थापक (Deputy Manager) - ग्रामीण व्यवस्थापनात MBA संबंध व्यवस्थापक (Relationship Manager) - B.E./ B. Tech आणि MBA/PGDM उत्पादन व्यवस्थापक (Product Manager) - B.E./ B. Tech आणि कम्प्युटरचं ज्ञान सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या