Home /News /career /

GATE 2022 Dates: 'या तारखेपासून सुरू होणार GATE 2022 साठी रजिस्ट्रेशन; परीक्षेची तारीख जाहीर

GATE 2022 Dates: 'या तारखेपासून सुरू होणार GATE 2022 साठी रजिस्ट्रेशन; परीक्षेची तारीख जाहीर

GATE 2022 या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया (GATE 2022 Registration Process) लवकरच सुरु होणार आहे.

    नवी दिल्ली, 26 ऑगस्ट:  Graduate Aptitude Test in Engineering म्हणजेच GATE 2022 परीक्षेच्या तारखांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. इंजिनिअरिंगनंतर पदव्युत्तर (Master courses after Engineering) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी GATE ही परीक्षा देणं अनिवार्य असतं. आता GATE 2022 या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया (GATE 2022 Registration Process) लवकरच सुरु होणार आहे. यंदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरकडे (IIT Khargpur) यंदाच्या GATE परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या परीक्षेचं सविस्तर नोटिफिकेशन वाचूनच मग नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या 30 ऑगस्ट 2021 पासून या परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठीची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा  BDS आणि M. Pharmची पदवी असलेल्या उमेदवारांनाही GATE परीक्षा देण्यात येणार आहे. अशी करा नोंदणी GATE 2022 च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्या. विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात. अर्ज फक्त एकच भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यापैकी फक्त एक स्वीकारला जाणार आहे. हे वाचा - ZP Pune Recruitment: पुणे जिल्हा परिषदेत 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी इतकं लागणार शुल्क SC, ST, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी - 750 रुपये (लेट फीसह 1250 रुपये) इतर उमेदवारांसाठी - 1500 रुपये (लेट फीसह 2000 रुपये) ही आहे परीक्षेची तारीख 05, 06, 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 या तारखांना GATE 2022 ही परीक्षा होणार आहे. या तारखा तात्पुरत्या असून क्रोणाचा प्रादुर्भाव बघून तारीख बदलण्यात येऊ शकते असं सांगण्यात आलं आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या