नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये
(Staff Selection Commission Recruitment) काही पदांच्या तब्बल 3261 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(SSC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. संबंधित विषयांमध्ये बारावी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण असलेल्या उमेदवारांच्या पदांसाठी ही भरती
(Staff Selection Commission Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
कनिष्ठ बियाणे विश्लेषक - 03
गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर - 34
चार्जमन (मेकॅनिकल) - 03
चार्जमन (धातूशास्त्र) - 02
वैज्ञानिक सहाय्यक (एम अँड ई/मेटलर्जी) - 02
लेखापाल - 01
हेड क्लर्क - 01
पुनर्वसन समुपदेशक - 01
तांत्रिक अधीक्षक (विणकाम) - 01
तांत्रिक सहाय्यक (वन्यजीव) - 01
संशोधन अन्वेषक (वनीकरण) - 01
उपसंपादक (हिंदी)- 01
उपसंपादक (इंग्रजी)-01
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (जीवशास्त्र) - 03
स्टाफ कार ड्रायव्हर (ऑर्ड. ग्रेड) - 01
मल्टी टास्किंग स्टाफ - 398
संरक्षण सहाय्यक तांत्रिक - 01
कनिष्ठ संगणक - 01
इत्यादी... (अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बघावं)

Staff Selection Commission Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी किंवा पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदानुसार विशेष शिक्षण घेतलं असणंही आवश्यक आहे.
हे वाचा -
PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत 'या' पदांच्या तब्बल 91 जागांसाठी भरती
प्रवर्गानुसार वयोमर्यादा
SC/ ST -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 5 वर्षे सूट
OBC -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 3 वर्षे सूट
PwD -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 10 वर्षे सूट
PwD+OBC -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 13 वर्षे सूट
PwD+SC/ ST -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 15 वर्षे सूट
असं असेल परीक्षेचं स्वरूप
या भरतीसाठी असं करा अप्लाय
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांना SSC च्या https://ssc.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. तसंच ऑनलाईन अप्लाय करताना महत्त्वाचे कागदपत्रं अपलोड करायचे आहेत. यानंतर परीक्षेसाठीचं शुल्क भरून अप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे.
हे वाचा -
MAHAGENCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत इंजिनिअर्ससाठी भरती
परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 100/- रुपये असणार आहे. तर महिला उमेदवार, SC, ST, PWD, EWS उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2021
JOB TITLE | Staff Selection Commission Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | संबंधित विषयांमध्ये बारावी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी भरती |
शैक्षणिक पात्रता | उमेदवारांनी बारावी किंवा पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक |
प्रवर्गानुसार वयोमर्यादा | SC/ ST -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 5 वर्षे सूट
OBC -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 3 वर्षे सूट
PwD -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 10 वर्षे सूट
PwD+OBC -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 13 वर्षे सूट
PwD+SC/ ST -- अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 15 वर्षे सूट |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 100/- रुपये |
शेवटची तारीख | 25 ऑक्टोबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://ssc.nic.in/Registration/Home या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.