जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / रोगापेक्षा इलाज भयंकर! म्हणून दहावी-बारावीच्या परीक्षेला मिळणार 10 मिनीटं कमी

रोगापेक्षा इलाज भयंकर! म्हणून दहावी-बारावीच्या परीक्षेला मिळणार 10 मिनीटं कमी

रोगापेक्षा इलाज भयंकर! म्हणून दहावी-बारावीच्या परीक्षेला मिळणार 10 मिनीटं कमी

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून द्या अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 13 फेब्रुवारी : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून द्या अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे. पेपरफुटी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यावरच पेपर वाटण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी मिळेल, त्यामुळे त्यांना पुढील 10 मिनिट वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटं गमवावी लागणार आहे. पूर्वी परीक्षेआधी दहा मिनिटं विद्यार्थ्यांना पेपर दिला जात होता. वाढत्या पेपरफुटीच्या घटनांमुळं आता ही पद्धत बंद केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या मिनिटाला हातात प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. सकाळी 11 वाजताच्या पेपरला अर्धा तास आधी 10.30 वाजता तर दुपारी 3 वाजताच्या पेपरला 2.30 वाजता हजेरी लावावी लागणार आहे. पालकांनी या निर्णयाला विरोध केलाय. कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्नचा एक भाग म्हणून ही पद्धत लागू करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलंय. कॉपी परीक्षा पद्धतीला लागलेली कीड आहे. ही कीड मारुन टाकण्यासाठी परीक्षेचे दहा मिनिटं कमी करणं म्हणजे आजारापेक्षा इलाज भयानक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात