जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SSC Board Exam : गणित विषयात पास होण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

SSC Board Exam : गणित विषयात पास होण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

SSC Board Exam : गणित विषयात पास होण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

गणिताचा पेपर म्हणजे पोटात गोळा येतो. गणिताचा पेपर पॅटर्न कसा असेल हे पाहा sample paperमध्ये.

  • -MIN READ Aglasem
  • Last Updated :

मुंबई, 13 मार्च : गणिताचा पेपर म्हणजे डोक्यावर भलमोठं टेन्शन असतं. आता पेपरला फक्त काही तास उरले आहेत. अशावेळी इतर काही कऱण्यापेक्षा एकदा Sample paperचा आढावा घेऊन पास होण्यासाठी कसा अभ्यास करता येईल आणि हुशार विद्यार्थ्यांनी आपण अधिक चांगले कसे मार्क मिळवू शकतो. यावर भर देणं आवश्यक आहे. भीती घालवा- मला जमणार नाही किंवा मी चुकेन अशी भीती मनातून घालवून टाका. गणिताची भीती किंवा विसरणार नाही याची काळजी घ्या. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा- आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लीअर करा. त्यासाठी आधीच्या वर्षातील पुस्तकं रेफर करा. कन्सेप्ट क्लीअर नसेल तर आपल्याला प्रश्नच समजण्यात अडथळे येतील. गणिताची प्रक्रिया फॉलो करा- गणित सोडवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रत्येक फॉर्म्युला आणि स्टेपला महत्त्व असतं. त्यामुळे त्या गाळू नका. प्रत्येक वर्षातील गणिताचे धडे महत्त्वाचे असतात, ते एकमेकांसोबत लिंक केलेलं असतं. फॉर्म्युल्याची वेगळी वही करा, जी पेपरआधी फक्त आपल्याला वेगळी रेफर करता येईल. हे फॉर्म्युले लिहून सराव करा. आधीच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. त्यामुळे आपल्याला प्रश्न कशा पद्धतीनं विचारला जातो याचा अंदाज येईल. घोकंपट्टी नाही तर डोक्यानं सोडवा. त्यातून कोणत्या धड्यातील प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येईल, ते धड्यांचा सराव जास्त करा. कोणताही प्रश्न सोडू नका पण आधी येणारा प्रश्न पहिला सोडवा, त्यानंतर न येणाऱ्या किंवा अवघड प्रश्नांकडे वळा म्हणजे आपल्याला वेळ पुरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SSC , ssc board
  • First Published :
जाहिरात
जाहिरात