• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Job Alert: सोलापूर विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी भरती; एकूण 88 जागा रिक्त

Job Alert: सोलापूर विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी भरती; एकूण 88 जागा रिक्त

प्राध्यापकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

 • Share this:
  सोलापूर, 27 जून : सोलापूर विद्यापीठात (Solapur University Recruitment) प्राध्यापक (Professor jobs) पदासाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदासाठी तब्बल 88 जागांसाठी पदभरती होणार आहे. प्राध्यापकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पदाचं नाव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 88 शैक्षणिक पात्रता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अप्लाय करणारे उमेदवार पदव्युत्तर पदवी पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच नेट किंवा सेट किंवा पीएचडी समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. असा करा अर्ज est.section@sus.ac.in या ईमेल आयडीवर उमेदवार सर्व गरजेचे कागदपत्र आणि अर्ज पाठवू शकतात. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीबाबत माहिती कळवण्यात येईल  अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 28 जून असणार आहे. या पदभरती अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: