जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SBI PO Recruitment 2022: स्टेट बँकेत नोकरीची आजची शेवटची संधी; लगेच या लिंकवर करा अप्लाय

SBI PO Recruitment 2022: स्टेट बँकेत नोकरीची आजची शेवटची संधी; लगेच या लिंकवर करा अप्लाय

SBI PO Recruitment 2022: स्टेट बँकेत नोकरीची आजची शेवटची संधी; लगेच या लिंकवर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायला हवा.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑक्टोबर:   सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खूशखबर आहे. देशातील सर्वांत मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच एसबीआयने भरती काढली आहे. ही भरती पीओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसरपदासाठी असून, देशभरातून दीड हजारांपेक्षा जास्त उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख येऊन ठेपली आहे, त्यामुळे या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायला हवा. कोरोनामुळे गेली दोन वर्षं नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या नव्हत्या; पण आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, एसबीआयने काढलेल्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 पदांसाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे. पदवी उत्तीर्ण उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या जागा एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO Recruitment 2022) या पदांसाठी भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार वेळ न दवडता बँकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. मोठी बातमी! 6 महिन्यात दिले 20,000 जॉब्स; या IT कंपनीत अजूनही 10 हजार जागा शिल्लक जे उमेदवार अर्ज करतील, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती अशी, की एसबीआय पीओची प्रीलिम परीक्षा 17, 18, 19 आणि 20 डिसेंबर 2022 रोजी घेतली जाईल. जे उमेदवार प्रीलिम परीक्षा उत्तीर्ण होतील ते एसबीआय पीओ मेन्स परीक्षेला बसू शकतील आणि त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्टमध्ये सहभागी होऊ शकतील. एसबीआय पीओ 2022 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावं. उमेदवार 27 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या अर्जाची प्रिंट काढू शकतात. SBI PO Recruitment 2022: अर्ज कसा करायचा? - सर्वांत आधी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या. - तिथे करिअर लिंकवर क्लिक केल्यास एक नवीन पेज उघडेल. - SBI PO लिंकवर क्लिक करा आणि ऑनलाइन फॉर्म भरा. - त्यानंतर अर्ज फी भरा. - फी भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा. फ्रेशर्ससाठी सर्वात मोठी खूशखबर! ‘ही’ नामांकित IT कंपनी तब्बल 5000 जागांवर करणार भरती SBI PO Recruitment 2022 साठी अर्ज फी किती? सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी 750 रुपये आहे. तर एससी/ एसटी/ पीडब्ल्युबीडी उमेदवारांकडून कोणतीही अर्ज फी आकारली जाणार नाही. अशा रितीने तुम्ही एसबीआयमधील पीओ पदासाठी अर्ज करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात