मराठी बातम्या /बातम्या /करिअर /SBI Clerk Result: प्रिलिम्स परीक्षेचा निकाल लागला पण पुढे काय? कसा कराल Mains चा अभ्यास? वाचा IMP टिप्स

SBI Clerk Result: प्रिलिम्स परीक्षेचा निकाल लागला पण पुढे काय? कसा कराल Mains चा अभ्यास? वाचा IMP टिप्स

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया

Sbi Clerk Prelims Result: या प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पण आता पुढे काय? यानंतरची प्रोसेस कशी नक्की कशी असेल जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 जानेवारी: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 5008 पदांची भरती होणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार या परीक्षेची प्रिलिम्स परीक्षा काही दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. या प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पण आता पुढे काय? यानंतरची प्रोसेस कशी नक्की कशी असेल आणि याचा अभ्यास कसा करायला हवा? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

ज्या उमेदवारांनी प्रिलिम्स परीक्षा पास केली आहे अशा उमेदवारांना आत मेन्स म्हणजे मुख्य परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. तसंच स्थानिक भाषेच्या चाचणीसाठीही तयार राहावं लागणार आहे. पण त्या आधी प्रिलिम्सचा निकाल नक्की कसा बघावा जाणून घेऊया.

JOB ALERT: फक्त मुंबई-पुणेच नाही तर तुमच्या शहरांमध्येही आहेत बंपर जॉब ओपनिंग्स; इथे बघा लेटेस्ट जॉब्स

अशा पध्दतीन चेक करा तुमचा निकाल

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in/web/careers वर जा.

होमपेजवर, “SBI Clerk Result 2022 डाउनलोड करा” असे लिहिलेल्या लिंकची लिंक.

लॉगिन क्रेडेंशियल्स जसे की नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक आणि आवश्यक असल्यास जन्मतारीख प्रविष्ट करा.

तुमचा SBI लिपिक प्रीलिम्स निकाल 2022 स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

लिपिक संवर्गातील ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) ची भरती मोहीम देशभरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये 5,008 रिक्त जागा भरण्यासाठी आहे. निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात, उमेदवार मुख्य परीक्षा आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेच्या चाचणीसाठी उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Fire Department Bharti: पात्रता 12वी आणि 69,100 रुपये पगार; एकही परीक्षा नाही; थेट होणार मुलाखत

कोणत्या प्रवर्गाला किती पदं

स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या या रिक्त पदांद्वारे लिपिकांच्या एकूण 5008 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण श्रेणीसाठी 2143 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ओबीसींच्या 1165 पदांची भरती केली जाणार आहे. त्याच बरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS च्या एकूण 490 पदे, SC च्या 743 पदे आणि ST च्या 467 पदांची भरती केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसावे लागेल.

असा करा Mains परीक्षेचा अभ्यास

लक्षात ठेवा प्रिलिम्स परीक्षेपेक्षा Mains परीक्षा ही कठीण असणार आहे त्यामुळे सर्व तयारी करूनच Mains परीक्षेला बसा.

बँकेच्या संदर्भातील काही महत्वाच्या आणि बेसिक गोष्टी नक्की वाचा. बँकिंग स्किल्सवर प्रश्न विचारण्यात येऊ शकतात.

तसंच करंट अफेअर्स आणि इतर महत्त्वाच्या टॉपिक्सचा अभ्यास करा.

तुम्ही निवडलेल्या स्थानिक भाषेविषयी अभ्यास करा. प्रश्न कठीण असू शकतात त्यामुळे संपूर्ण तयारीत राहा.

लक्षात ठेवा तुम्ही सरकारी नोकरीच्या फक्त एक पाऊल दूर आहात त्यामुळे हार मानू नका आणि अभ्यास करत रहा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Exam result, Jobs Exams, SBI, Sbi bank job, State bank of india