नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळात प्राथमिक शिक्षक या पदांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली असून, अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार WBBPE च्या wbbpeonline.com या अधिकृत वेबसाइट आणि wbbpe.org वर जाऊन नोकरीसाठी अर्ज करू शकतात. 14 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. नोकरीसाठी उमेदवार https://www.wbbpeonline.com/ या लिंकद्वारेही प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात. याशिवाय WBBPE Primary Teacher Recruitment 2022 Notification PDF या लिंकवर क्लिक करूनही अधिकृत नोटिफिकेशन पाहता येऊ शकते. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 11,765 पदांसाठी पदभरती होणार आहे.
अर्ज प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा
प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज प्रक्रिया करण्यासाठी विविध तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यात 21 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत यासाठी अर्ज करता येऊ शकतो.
वयोमर्यादेची अट, शुल्क आणि वेतन
प्राथमिक शिक्षक पदासाठी उमेदवाराचं वय कमीतकमी 18 वर्षं व जास्तीतजास्त 40 वर्ष असणं आवश्यक आहे. उमेदवाराने एनसीटीईने जाहीर केलेल्या शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करणं आवश्यक आहे. याशिवाय टीईटी उतीर्ण असावं. डीएड, बीएड असणं गरजेचं आहे.
अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवाराला 150 रुपये तर इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी उमेदवाराला 100 रुपये शुल्क भरावं लागेल. तर अनुसूचित जाती-जमाती व दिव्यांग म्हणजेच एससी-एसटी-पीएचसाठी 50 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.
असे असतील वेतन व भत्ते
प्राथमिक शिक्षक पदासाठी नोकरीचे अर्ज करताना पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाकडून वेतन व भत्ते जाहीर केले आहेत. त्यानुसार उमेदवाराला 28,900 वेतन दिलं जाणार आहे. याशिवाय डीए, मूळ वेतनावर 12 टक्के एचआरए दिला जाईल.
हे वाचा - सर्वात मोठी बातमी! तब्बल 2500 कर्मचारी होणार बेरोजगार; Byju's मध्ये चाललंय काय?
पश्चिम बंगालमध्ये विविध जिल्ह्यांत होणार भरती
पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत पश्चिम बंगालमधील जिल्ह्यांमध्ये विविध माध्यमांसाठी ही शिक्षक भरती होत आहे. यात प्रामुख्यानं अलीपुरद्वार, बांकुडा, बीरभूम, कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर, हुगळी, हावडा, जलपैगुडी, झडग्राम, कोलकाता, मालदा, मुर्शिदाबाद, 24 परगाणा, पश्चिम वर्धमान, पूर्व वर्धमान, पश्चिम मेदिनीपूर, पुरूलिया, सिलिगुडी, दक्षिण 24 परगणा, उत्तर दिनाजपूर या जिल्ह्यांमध्ये शिक्षक पदभरती होणार आहे.
हे वाचा - सेंट्रल रेल्वेत 596 जागांसाठी भरती आणि पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; ही घ्या Link
अभ्यासेतर गुण व अनुभवाचेही असतील गुण
प्राथमिक शिक्षक पदभरती करताना अभ्यासेतर व अनुभवाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यात प्रामुख्यानं विविध खेळांत प्रावीण्य, एनसीसी, आर्ट आणि लिटरेचर, परफार्मिंग आर्ट (ड्रामा), म्युझिक आदीसाठी प्रत्येकी 1 असे एकूण पाच गुण दिले जाणार आहेत. तर अनुभवासाठीही गुण विभागणी केली गेली आहे. यात 10 वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असल्यास 5 गुण, 8 ते 10 वर्षांचा अनुभव असल्यास 4 आणि 6 ते 8 वर्षं अनुभवासाठी 3, 4 ते 6 वर्षांसाठी 2 आणि 4 वर्षांपेक्षा कमी अनुभव असल्यास 1 गुण दिला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job, School teacher, Teacher