मुंबई, 01 नोव्हेंबर: मागीलवर्षी आयआयएफएल वेल्थ आणि हुरुन इंडियानं भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली होती. यामध्ये देशातील अशा श्रीमंत व्यावसायिकांना स्थान देण्यात आलं होतं, ज्यांनी वयाच्या चाळीशीपूर्वीच एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती कमवली आहे. या यादीमध्ये भारतातील सर्वांत मोठा ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म बायजूजचे संस्थापक बायजू रविंद्रन यांचाही समावेश होता. आठ हजार 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह हुरुनच्या यादीमध्ये रविंद्रन सहाव्या क्रमांकावर होते. यावरून, त्यांची कंपनी किती नफ्यात आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. मात्र, याच बायजू रविंद्रनवर आता कर्मचाऱ्यांची माफी मागण्याची वेळ आली आहे. ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअप बायजूज आपल्या दोन हजार 500 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रविंद्रन यांनी याबाबत कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सुवर्णसंधी सोडू नका! पुणे महापालिकेत 10वी ते ग्रॅज्युएट्सच्या 229 जागांसाठी भरती; आजची शेवटची तारीख सध्या भारतातील अनेक स्टार्टअप कंपन्या विशेषत: एज्युटेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. या (ऑक्टोबर) महिन्याच्या सुरुवातीला बायजूनं येत्या सहा महिन्यांत कंपनीतील दोन हजार 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बायजू रविंद्रन यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे की, नफा मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. आर्थिक कारणांमुळे मला हा निर्णय घेणं गरजेचं आहे. जेणेकरुन कंपनीला आर्थिकदृष्ट्या स्थिर ठेवण्यावर लक्ष केंद्रित करता येईल. Career Tips: नक्की किती असते एका एअर होस्टेसची सॅलरी? असे असतात पात्रतेचे कठोर निकष रविंद्रन यांनी लिहिलंय, आम्ही या आर्थिक वर्षात नफा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. झपाट्यानं होणाऱ्या ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक ग्रोथमुळे संस्थेमध्ये काही डुप्लिकेशन्स निर्माण झाली आहेत. ज्यांना ओळखणं आणि दुरुस्त करणं गरजेचं आहे. यासाठी कंपनी आपल्या पाच टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच दोन हजार 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. नक्की कोण असतात ब्लॉकचेन डेव्हलपर्स? असं करा यात करिअर; लाखो रुपये मिळेल पगार ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं जात आहे, त्यांच्याबद्दल बोलताना रविंद्रन म्हणाले, “ज्यांना बायजूज सोडावं लागत आहे, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटत आहे. तुम्ही कर्मचारी माझ्यासाठी फक्त काही नावं, आकडे किंवा कंपनीचे पाच टक्के नाहीत. तुम्ही माझ्या आयुष्याचा पाच टक्के भाग आहात. यामुळे मला मनापासून वाईट वाटत आहे. या कर्मचारी कपातीबद्दल मी तुमची माफी मागतो.” दरम्यान, कंपनीने या पूर्वी जूनमध्ये एक हजार 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.