मुंबई, 18 जुलै : मुंबईत अनेक जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत. जगभरातील विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात. त्यात अनेक व्यवस्थापन विषयक शिक्षण संस्था (Management Institutions) आहेत. पवईत IIT सारखी नावाजलेली संस्था आहे. आता मुंबईत शिक्षण घेणाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर आहे. पवईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनीअरिंग म्हणजेच NITIE ला (National Institute of Industrial Engineering) भारतीय व्यवस्थापन संस्था कायदा ,2017 (Indian Institute of Management Act,2017)च्या अंतर्गत आणण्यासाठी विधेयक (Bill) आणलं जाणार आहे. असं झालं तर मुंबईकरांना त्यांचं स्वत:चं IIM मिळेल. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवर याबद्दल वृत्त देण्यात आलं आहे. आजपासून संसेदचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये ( Parliament Monsoon Session) केंद्राचा हा विधीमंडळ अजेंडा असल्याची माहिती आहे. हे कितपत व्यवहार्य आहे याचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या (Central Education Ministry ) वतीने या वर्षी जानेवारी महिन्यात एका कमिटीचीही स्थापना करण्यात आली होती. या कमिटीबद्दल ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मध्ये यापूर्वी वृत्त देण्यात आलं होतं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अलाहबाद विद्यापीठाचे कुलगुरु आशिषकुमार चौहान या तज्ज्ञ कमिटीचे प्रमुख होते. तर IIT, BHU चे संचालक प्रमोदकुमार जैन, तिरुचिरापल्ली येथील IIM चे संचालक पवनकुमार सिंग, IIT, मुंबईचे संचालक शुभाशीष चौधरी आणि प्रदीप मेटल्सचे CMD, प्रदीप गोयल हेही या तज्ज्ञ कमिटीचे सदस्य होते. Career Tips: तब्बल 7 लाखांचं पॅकेज असणारं व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय? असं घ्या शिक्षण पवई तलावाजवळच्या 63 एकर जंगलाच्या परिसरात उंचावर ही संस्था आहे. या संस्थेला IIM चा दर्जा दिल्यास सध्या त्यात असलेली सहा हॉटेल्स, कॅफेटेरियाज, 14 निवासी इमारती आणि पाच कार्यालयीन इमारतींचं नूतनीकरण करण्याची योजना आहे. सरकारच्या मदतीनं गावात राहूनच करा हा व्यवसाय, होईल लाखोंची कमाई हे विधेयक पास झाल्यास NITIE इंडस्ट्रीयल इंजिनीअरिंग (Industrial Engineering), इंजिनीअरिंग मॅनेजमेंट (Engineering Management) आणि मॅनेजमेंट सायन्स (Management Science) या क्षेत्रांसाठी NITIE ही संस्था भविष्यातील शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं योगदान देऊ शकते, असं निरीक्षण केंद्रानं नोंदवलं आहे. यापुढच्या काळात IIM या मॅनेजमेंट क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या संस्थेचा NITIE हा भाग होऊ शकते असंही या कमिटीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात ‘विधेयक मांडणे, त्यावर चर्चा करणे आणि विधेयक संमत म्हणजे पास करणे’ यासाठीच्या 24 विधेयकांमध्ये याही विधेयकाचा समावेश आहे. जर हे विधेयक संमत झालं तर मुंबईला आणखी एक जागतिक दर्जाची आंतरराष्ट्रीय संस्था मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.