Home /News /career /

HSC Result: 12वीच्या निकालाची तारीख ठरली, पाहा कधी आणि कुठे पाहता येणार निकाल

HSC Result: 12वीच्या निकालाची तारीख ठरली, पाहा कधी आणि कुठे पाहता येणार निकाल

MH BOARD 12TH RESULT: राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानुसार उद्या बारावीचा निकाल लागेल.

पुढे वाचा ...
मुंबई, 07 जून: यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या 12 वीचा निकाल लागणार (Result of 12th will be Announced Tomorrow) आहे. उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे. किती वाजता जाहीर होणार निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. निकालाचं प्रिंट घ्या निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत असला तरीही क्रॉस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र तेवढ्यात 13 वी आणि इतर प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे.
सर्व माहिती तपासा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही. निकालानंतर 'ही' कागपत्रं असतील आवश्यक गुणपत्रिका (Board Marksheet) स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate) उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate) कॉलेज सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) आधार कार्ड (Aadhar card) जातीचा दाखला (Caste Certificate) रहिवासी दाखला (Address Proof) पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Board Exam, Exam result, HSC, State Board, Varsha gaikwad

पुढील बातम्या