मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Reliance Jio Recruitment: रिलायन्स जिओ मुंबई इथे इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणाऱ्या फ्रेशर्सना मोठी संधी; लगेच करा अप्लाय

Reliance Jio Recruitment: रिलायन्स जिओ मुंबई इथे इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणाऱ्या फ्रेशर्सना मोठी संधी; लगेच करा अप्लाय

Reliance Jio च्या मुंबईतील (Reliance Jio Mumbai jobs 2021)ऑफिसमध्ये ही जॉब्सची संधी असणार आहे.

Reliance Jio च्या मुंबईतील (Reliance Jio Mumbai jobs 2021)ऑफिसमध्ये ही जॉब्सची संधी असणार आहे.

Reliance Jio च्या मुंबईतील (Reliance Jio Mumbai jobs 2021)ऑफिसमध्ये ही जॉब्सची संधी असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई ,26 सप्टेंबर:  नामांकित टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Jio Recruitment 2021) इथे इंजिनिअर्सफ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. कोरोनामुळे स्मार्टफोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे IT आणि टेलिकॉम क्षेत्रातही काही कंपन्यामध्ये (Telecom Sector jobs) सध्या फ्रेशर्सना आणि IT प्रोफेशनल्सना (IT sector latest Jobs) जॉब्स मिळत आहेत. ज्या उमेदवारांनी या पदांशी निगडित असे कोर्स केले आहेत अशा उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. Reliance Jio नंही (Reliance Jio Recruitment 2021) सध्या कंपनीमध्ये काही इंजीनिअरिंग उत्तीर्ण असलेल्या पदवीधर फ्रेशर्सना नोकरी देण्याचं ठरवलं आहे. यासाठी फ्रेशर्स उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

Reliance Jio च्या मुंबईतील (Reliance Jio Mumbai jobs 2021)ऑफिसमध्ये ही जॉब्सची संधी असणार आहे. जे उमेदवार या पदभरतीसाठो पात्र असतील अशा उमेदवारांना लगेचच jio च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज नोंदवायचे आहेत.

या पदांसाठी असणार भरती

ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी (Graduate Engineer Trainee Network)

हे वाचा - Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 'या' जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी (Graduate Engineer Trainee Network) या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी यासाठी कोणत्याही ब्रांचमधून B.E./ B.Tech पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Cisco CCNA या कोर्समध्ये सर्टिफिकेशन घेतलं असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सध्याच्या इंडस्ट्रीमधील ट्रेंडनुसार पगार निश्चित करून देण्यात येणार आहे. तसंच शैक्षणिक पात्रता आणि मुलाखत यांच्या निकालावरही पगार अवलंबून असणार आहे.

ही असेल जबाबदारी

व्यवसाय, नियोजन आणि नियामक संघांकडून आवश्यकतेचं आकलन करणे.

संबंधित कार्यासाठी ऑपरेशनल नियोजन करणे.

संबंधित कामासाठी मंथली ऑपरेटिंग प्लॅन तयार करणे.

ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नेटवर्क प्लॅनिंग करणे तसंच ट्राफिक फ्री नेटवर्क ठेवणे.

क्रॉस-फंक्शनल टीम सदस्यांशी संपर्क ठेवणे.

दिलेली सर्व कामं वेळेत पूर्ण करणे.

हे वाचा -  TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत तब्बल 30 हजार रुपये पगाराची नोकरी

अशा पद्धतीनं करा अप्लाय

अधिकृत साइट Open www.jio.com ओपन करा.

मग होम पेज प्रदर्शित होईल.

यानंतर खाली स्क्रोल करा career टॅब सापडेल.

त्यावर क्लिक करा आणि नवीन पेज उघडेल.

पेजच्या उजव्या बाजूला जॉब मेनू बघा.

यानंतर Reliance Jio Trainee Jobs शोधा.

लिंक दिसेल तेव्हा त्यावर एक क्लिक करा.

संपूर्ण तपशील काळजीपूर्वक तपासा आणि जिओ ग्रॅज्युएट इंजिनियर ओपनिंगसाठी अर्ज करण्यास इच्छुक असल्यास जिओ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.jio.com/ या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, Reliance Jio, जॉब