मुंबई, 23 जून : मंदीसदृश परिस्थितीमुळे जागतिक आयटी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातदेखील केली आहे. जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय आयटी क्षेत्राची परिस्थिती काहीशी स्थिर मानली जात होती. मात्र, आता भारतीय आयटी क्षेत्रावरही मंदीचा परिणाम होत असल्याचं चित्र आहे. असा अंदाज आहे की, भारतातील आघाडीचे आयटी बिझनेस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) कमी हेडकाउंट नोंदवतील. सध्याच्या आव्हानात्मक मॅक्रो इकॉनॉमिक वातावरणात आयटी कंपन्या क्लायंट्स मिळवण्यात संघर्ष करत असल्याचं दिसत आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, उपलब्ध नोकऱ्यांचा अभाव हा ऑपरेशनल परिणामकारकता आणि नफ्याची टक्केवारी वाढवण्यावर भर दिल्याचा थेट परिणाम आहे. त्यांचा असा अंदाज आहे की, हे बिझनेस या वर्षाच्या पुढील सहामाहीत किंवा तिमाहीत पुन्हा नोकरीभरती करतील. High Paying Jobs in USA: अमेरिकेत जॉब करण्याची इच्छा आहे? मग ‘हे’ आहेत USA मधील टॉप सॅलरी जॉब्स मार्चमध्ये संपलेल्या मागील तिमाहीत भारतातील पाच आघाडीच्या आयटी कंपन्यांनी 5 हजार 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याची नोंद आहे. सर्वात जास्त कर्मचारी कपात डिसेंबरमध्ये (2022) संपलेल्या तिमाहीत झाली. त्यावेळी जवळपास पाच हजार पोझिशन्सची घट झाली. टीमलीज डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सी. यांच्या मते, सध्याचा ट्रेंड एप्रिल-जून तिमाहीत पुढे जाण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले, “आम्ही हा ट्रेंड सुरू राहील अशी अपेक्षा करतो. कारण सध्या सर्व कंपन्यांमध्ये अॅट्रिशन नियंत्रित करणं आणि युटिलायझेशनमध्ये सुधारणा करण्यावर अधिक भर दिला जात आहे.” Western Railway Recruitment: 1-2 नाही तर तब्बल 3624 जागा अन् पात्रता फक्त 10वी; रेल्वेत मेगाभरतीची घोषणा लॅटरल ऑनबोर्डिंगमध्ये आयटी उद्योगाला काहीसा विलंब बघावा लागला असला तरी, टीमलीजचा अंदाज आहे की, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस, बर्याच कंपन्या त्यांची सध्याची साधनं वापरताना दिसतील आणि ते अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांच्या शोधत असतील. सुनील म्हणाले, “बहुतेक उद्योगांनी 75 ते 80 टक्के युटिलायझेशनचा टप्पा पार केला आहे. परिणामी, आमचा असा अंदाज आहे की, एकदा त्यांनी तो टप्पा गाठला की, त्यांना अतिरिक्त साधनं जोडण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल. हे आकडे फारसे महत्त्वाचे नसले तरी आमच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सर्व सेवा संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.” PMC Recruitment: तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; करा अप्लाय नोकरभरतीतील संथपणाच्या ट्रेंडचा परिणाम कर्मचार्यांच्या ऑनबोर्डिंगवरदेखील झाला आहे. बर्याच कंपन्या त्यांच्या क्लायंटकडून मिळणाऱ्या क्लॅरिटीची वाट पाहत असल्यानं नवीन आणि लॅटरल हायरिंग पुढे ढकललं जात आहे. 2023-2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत झालेली बहुतांश भरती ही, अॅट्रिशनमुळे रिक्त झालेली अत्यावश्यक पदं भरण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. Adecco India मधील डायरेक्टर ऑफ मॅनेज्ड सर्व्हिसेस अँड प्रोफेशनल स्टाफिंग, ए. आर. रमेश यांच्या मते, आयटी सर्व्हिस टॅलेंटच्या गरजेपेक्षा आयटी प्रॉडक्ट टॅलेंटची मागणी लक्षणीयरित्या चांगली आहे. रमेश म्हणाले की, आयटी सर्व्हिस टॅलेंट मार्केटच्या रिकव्हरीचे कोणतेही स्पष्ट संकेत नसल्यामुळे हे मार्केट सतत दबावाखाली आहे. Railway Jobs: रेल्वेत नोकरी हवीये ना? मग असा अभ्यास कराल तर एका झटक्यात मिळेल सरकारी नोकरी रमेश असंही म्हणाले, “आमचा अंदाज आहे की, जुलै-सप्टेंबर कालावधी देखील असाच संथ राहील. कारण, आर्थिक रिकव्हरी अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाही.” जेव्हा महत्त्वपूर्ण पदांसाठी भरती करण्याचा विचार येतो तेव्हा, बहुसंख्य कंपन्या जुनाट दृष्टिकोन स्वीकारताना दिसत आहेत. मात्र, तात्पुरत्या मनुष्यबळाची गरज पूर्वीपेक्षा खूपच जास्त असल्याचंही रमेश यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.